Join us  

शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४५८, तर निफ्टी १२९ अंकांनी कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 2:21 AM

निफ्टी १२१९७ वर उघडला व १२२१७ पर्यंत वधारून मग घसरगुंडी सुरू झाली ती १२१०७वर बंद होईपर्यंत कायम होती

नागपूर/मुंबई : अमेरिका व इराण, इराकमधील वाढता तणाव यामुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाल्याने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक ४५८ तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी १२९ अंकानी कोसळले. सेन्सेक्स आज ४१५११ अंकावर उघडली व सकाळच्या सत्रात केवळ ६ अंकांनी वाढून ४१५१६ झाला व तिथून घसरगुंडी सुरू झाली, ती बाजार बंद होईपर्यंत सुरू होती. सेन्सेक्स ४११५५ अंकावर बंद झाला.निफ्टीनेही अशीच वाटचाल केली. निफ्टी १२१९७ वर उघडला व १२२१७ पर्यंत वधारून मग घसरगुंडी सुरू झाली ती १२१०७वर बंद होईपर्यंत कायम होती. सेन्सेक्समधील ३० पैकी फक्त ९ समभाग वधारून बंद झाले, तर २१ समभागांच्या किंमतीत घट झाली. किंमती घटणाऱ्यांमध्ये नेस्ले इंडिया (१५६७०.८०), एचसीएल (६०४.३५), हिंदुस्तान युनिलिव्हर (२०६१.३५), इन्फोसिस (७७७.९०), बजाज फायनान्स (४१६५.५०), टीसीएस (२१६८.६५), एल अँड टी (१३४८.५०), ओएनजीसी (११७.२०), रिलायन्स इंडस्ट्रीज (१५०६.६०), टायटन (१२१४.२५), कोटक बँक (१६१८.८०), एनटीपीसी (११२.९५), भारती एअरटेल (५१४.३०), पॉवर ग्रीड (१९२.९०), स्टेट बँक (३१६.२०), एचडीएफसी बँक (१२१२.९०), इंडसइंड बँक (१२७१.६०) व टाटा स्टील (४६२.४०) आदींचा समावेश होता.अर्थसंकल्पापर्यंत अस्थिरताचशेअर बाजारातील अस्थिरता केंद्रीय अर्थसंकल्प सादर होईपर्यंत कायम राहील, अशी शक्यता शेअर दलालांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :शेअर बाजार