Join us  

सेन्सेक्स पोहोचला 48 हजारांवर; बाजारातील तेजी सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2021 5:41 AM

मुंबई शेअर बाजारात सोमवारच्या व्यवहारांची सुरुवात तेजीमध्ये झाली. त्यानंतर संवेदनशील निर्देशांकाने ४८ हजार अंशांचा टप्पा ओलांडला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनावरील लसीला मंजुरी मिळाल्याने बाजारातील गुंतवणूकदारांच्या उत्साहाला आणखी उधाण आले असून संवेदनशील निर्देशांकाने प्रथमच ४८ हजारांचा टप्पा पार केला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या निफ्टीनेही नवीन उच्चांकाची नोंद केली आहे. 

मुंबई शेअर बाजारात सोमवारच्या व्यवहारांची सुरुवात तेजीमध्ये झाली. त्यानंतर संवेदनशील निर्देशांकाने ४८ हजार अंशांचा टप्पा ओलांडला. दिवसअखेर हा निर्देशांक ३०७.८२ अंश म्हणजेच ०.६४ टक्क्यांनी वाढून ४८,१७६.८० अंशांवर बंद झाला आहे. या निर्देशांकाची ही नवीन उंची आहे. दिवसभरामध्ये या निर्देशांकाने ४८,२२०.४७ अशी उच्चांकी धडक दिली होती. राष्ट्रीय शेअर बाजारामध्येही खरेदीसाठी गुंतवणूकदारांचा उत्साह दिसून आला. येथील निर्देशांक (निफ्टी) ११४.४० अंश म्हणजे ०.८२ टक्क्यांनी वाढून १४,१३२.९० अंशांवर बंद झाला. याआधी हा निर्देशांक १४,१४७.९५ अंश असा उच्चांकी पोहोचला होता.कोरोनाच्या लसीबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारांमधील सकारात्मक वातावरण, पीएमआय तसेच जीएसटी संकलनामध्ये झालेली वाढ अशा अर्थव्यवस्थेशी निगडित सकारात्मक बाबीही बाजाराला नवीन उंचीवर पाेहोचवण्यास हातभार लावणाऱ्या ठरल्या. 

या समभागांमध्ये झाली वाढशेअर बाजारामध्ये मोठी तेजी दिसत असली तरी सर्वाधिक व्यवहार हे माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये झाले. त्याच्या जोडीलाच एफएमसीजी कंपन्या तसेच बँका आणि वित्तीय संस्थांचे समभाग तेजीमध्ये राहिले.

टॅग्स :शेअर बाजार