Join us  

Share Market : सेन्सेक्स, निफ्टीची उच्चांकी भरारी; खासगी बॅंका, वाहन कंपन्या तेजीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2021 5:17 AM

Share Market : मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक हा काहीसा मंदीने सुरू झाला. मात्र, रुपयाचे वाढते मूल्य आणि गुंतवणूकदारांचा उत्साह त्यामुळे हा निर्देशांक बाजार बंद होताना २२८.४६ अंशांनी वाढून ५२,३२८.५१ अंशांवर बंद झाला.

मुंबई : देशातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने विविध राज्यांनी निर्बंध हटविण्यास प्रारंभ केल्याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारात दिसून आला. सोमवारी बाजारात मोठी तेजी दिसून आली. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन उच्चांकाची नोंद केली आहे. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक हा काहीसा मंदीने सुरू झाला. मात्र, रुपयाचे वाढते मूल्य आणि गुंतवणूकदारांचा उत्साह त्यामुळे हा निर्देशांक बाजार बंद होताना २२८.४६ अंशांनी वाढून ५२,३२८.५१ अंशांवर बंद झाला. या निर्देशांकाचा हा सार्वकालिक उच्चांक आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)मध्येही ८१.४० अंश म्हणजे ०.५२ टक्क्यांची वाढ झाली आहे. हा निर्देशांक १५,७५१.६५ अंशांवर बंद झाला. या निर्देशांकानेही नवीन उच्चांकी धडक दिली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांनीही १.३५ टक्क्यांची वाढ नोंदविली आहे. सोमवारी बाजारामध्ये खासगी बँका, वाहन कंपन्या आणि माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांना मोठी मागणी असलेली दिसून आली. कोरोनाची कमी होत असलेली रुग्णसंख्या, बहुसंख्य राज्यांनी कमी केलेले निर्बंध, रुपयाचे वाढते मूल्य आणि परकीय वित्तसंस्थांकडून बाजारात होत असलेली मोठी गुंतवणूक यामुळे बाजाराच्या वाढीला चांगलाच हातभार लागलेला दिसून आला.

टॅग्स :शेअर बाजारनिर्देशांक