Join us  

सेन्सेक्स, निफ्टी सात महिन्यांच्या नीचांकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 3:02 AM

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स व राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण होऊन दोन्ही निर्देशांक सात महिन्यांच्या नीचांकावर पोहोचले आहेत.

मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स व राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण होऊन दोन्ही निर्देशांक सात महिन्यांच्या नीचांकावर पोहोचले आहेत. घसरणारा रुपया व वित्त संस्थांवरील संकट कायम असल्याने शेअर बाजारात कमालीची अस्वस्थता आहे. आशियातील बहुतांश शेअर बाजार मंगळवारी कोसळले.बिगर बँक वित्त संस्था आर्थिक संकटात असल्याने बाजारात दोन आठवड्यांपासून सातत्याने चढ-उतार सुरु आहे. सोमवारी बाजार कोसळल्याने मंगळवारी तो काहीसा वधारेल, अशी शक्यता होती. पण मंगळवारीसुद्धा दोन्ही शेअर बाजाराच्या निर्देशांकात घसरण झाली. या दोन्ही बाजारांचे निर्देशांक दिवसभर ८ ते १० वेळा १०० अंकांपर्यंत वर-खाली झाले. त्यानंतर सेन्सेक्स २८७ अंक घसरणीसह ३३,८४७ अंकांवर व राष्टÑीय शेअर बाजाराचा निफ्टी ९८ अंकांच्या घसरणीसह बाजार १०,१४६ वर बंद झाला.डॉलरसमोर रुपया आणखी कमकुवत झाला. डॉलर ७३.५५ रुपये या दोन महिन्यांच्या उच्चांकावर गेला. याचा आयातीवर परिणाम होण्याच्या भीतीने गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केली. याखेरीज दहा मोठ्या एनबीएफसींचे समभाग ८ ते १० टक्के घसरले.

टॅग्स :निर्देशांक