Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाच राज्यांच्या निकालापूर्वी शेअर बाजारात मोठी घसरण, सेंसेक्स 600 अंकांनी कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 13:34 IST

आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाल्याने आर्थिक जगतात मोठी खळबळ उडाली आहे.

मुंबई - आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाल्याने आर्थिक जगतात मोठी खळबळ उडाली आहे. सोमवारी व्यवहारांना सुरुवात झाल्यावर मुंबई शेअरबाजाराचा संवेदनशील सूचकांक असलेल्या सेंसेक्समध्ये मोठी पडझड झाली. भागधारकांनी विक्रीचा धडाका लावल्याने सेंसेक्स 609.58 अंकांनी घसरला. तर निफ्टीमध्येही  187 आंकांनी घसरण झाली. शेअर बाजारातील घसरणीमागे पाच राज्यांतील एक्झिट पोलचा भाजपाविरोधात आलेला कल, तेल उत्पादक देशांच्या ओपेक या संघटनेने तेलाच्या उत्पादनात कपात करण्याची केलेली घोषणा, चीनमधील स्मार्टफोन कंपनी हुआवेच्या संस्थापकांची मुलगी आणि  सीएफओ यांना कॅनडामध्ये करण्यात आलेली अटक, अमेरिकन शेअर बाजारांमध्ये झालेली घसरण आणि शेती क्षेत्रामधील अडचणी या कारणांमुळे शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :शेअर बाजारनिर्देशांकव्यवसाय