Join us  

मुहूर्तालाच शेअर बाजाराचा सेन्सेक्स कोसळला 194 अंकांनी, अभिनेत्री रिचा चड्डाने केले उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2017 9:21 PM

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक गुरुवारी मुहूर्तालाच 194 अंकांनी कोसळला. दरवर्षी शेअर बाजारात लक्ष्मीपूजनाला विशेष पूजा होते.

ठळक मुद्दे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही 1,572 अंकांची वाढ झाली. उद्या

मुंबई - मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक गुरुवारी मुहूर्तालाच 194 अंकांनी कोसळला. दरवर्षी शेअर बाजारात लक्ष्मीपूजनाला विशेष पूजा होते. त्यानंतर तासाभर शेअर्सच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराचे सत्र होते. यंदा शेअर बाजाराचा निर्देशांक 194 अंकांनी कोसळून 32,389 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये 64 अंकांची घसरण होऊन निफ्टी 10,146 वर बंद झाला. 

धातू आणि बँकांच्या स्टॉक्समध्ये घसरण झाली. बाजार उघडल्यानंतर निर्देशांक 32,656 अंकांवर होता. त्यामध्ये 32,663 अंकांपर्यंत वाढ झाली. मुहूर्ताच्या खरेदी सत्रामध्ये सहभागी झालेल्या ग्राहकांनी शेअर्सची विक्री केल्याने निर्देशांक 194 अंकांनी कोसळून 32,389 अंकांवर बंद झाला. 

मागच्या वर्षभरात निर्देशांकाने 4,642 अंकांची वाढ नोंदवली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही 1,572 अंकांची वाढ झाली. उद्या पाडवा आणि त्यानंतर भाऊबीज असल्याने पुढचे दोन दिवस शेअर बाजार बंद असेल. अभिनेत्री रिचा चड्डाने मुहूर्ताच्या ट्रेडिंगचे उदघाटन केले. 

टॅग्स :शेअर बाजार