मुंबई : जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेल्या सकारात्मक वातावरणाचा लाभ भारतातील शेअर बाजाराला झाला. त्यामुळे एक दिवसाच्या खंडानंतर बाजारामध्ये तेजी दिसून आली.गुरुवारी सकाळपासूनच बाजारात तेजीचे वातावरण होते. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३६,८०६ अशांपर्यंत वाढला. मात्र बाजार बंद होताना तो थोडासा खाली येऊन ३६,७३७.६९ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकापेक्षा त्यामध्ये ४०८.६८ अंशांची वाढ झालेली दिसून आली.राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)ही वाढीव पातळीवर बंद झाला. हा निर्देशांक १०७.७० अंश म्हणजेच १.०१ टक्क्यांनी वाढून १०,८१३.४५ अंशांवर थांबला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही सुमारे अर्ध्या टक्क्याची वाढ झाली.
सेन्सेक्समध्ये झाली ४०० अंशांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 03:45 IST