Join us
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअ‍ॅपवर बँकिंग सेवा देणारी ‘ही’ देशातील दुसरी बँक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 04:48 IST

सारस्वत सहकारी बँकेने अलिकडेच व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग सेवा सुरू केली आहे. यामुळे ग्राहकांना बँकिंगशी निगडीत सेवा व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध होतील.

मुंबई : सारस्वत सहकारी बँकेने अलिकडेच व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग सेवा सुरू केली आहे. यामुळे ग्राहकांना बँकिंगशी निगडीत सेवा व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध होतील. अशा प्रकारची सेवा सुरू करणारी सारस्वत ही सहकार क्षेत्रातील पहिलीच बँक तर देशातील दुसरी बँक ठरली आहे.व्हॉट्सअ‍ॅपने अलिकडेच ‘व्हॉट्सअ‍ॅप फॉर बिझनेस’ ही सेवा सुरू केली. सारस्वत बँकेने तिचा अंगिकार केला आहे. ग्राहकांना एसएमएसऐवजी व्हॉट्सअ‍ॅपवर नोटिफिकेशन्स मिळतील. ग्राहक व्हॉट्सअ‍ॅपवर संवाद साधू शकतात. शिवाय खात्यातील शिल्लक तपासणे, मिनी स्टेटमेंट, मोबाईल बँकिंग नोंदणी, अर्ज, अ‍ॅप डाऊनलोड आदी व्यवहार आता व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून करता येणार आहेत.

टॅग्स :बँक