Join us

SBI Q1 Result : देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेला ₹१६८८० कोटींचा नफा, व्याजातून कमाईही वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 14:35 IST

एक्सचेंज फाइलिंगनुसार, व्याजातून कमाईचा आकडाही वाढला आहे.

SBI Q1 Results: देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट  बँकेनं जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. बँकेला पहिल्या तिमाहीत 16880 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत बँकेला 6068 कोटी रुपयांचा नफा झाला होता. 

एक्सचेंज फाइलिंगनुसार, व्याजातून कमाईचा आकडाही वाढला आहे. यामध्ये 31196 कोटी रुपयांवरून 38904 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे अडकलेल्या कर्जांच्या रकमेतही घट झाली. ग्रॉस एनपीए 2.78 टक्क्यांवरून 2.76 टक्क्यांवर आलाय. तर नेट एनपीए 0.67 टक्क्यांवरून 0.71 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. एनपीए प्रोव्हिजनिंग वाढून 2652 कोटी रुपये झाली आहे. एका वर्षापूर्वी याच कालावधीत ती 4268 कोटी रुपये होती.

बँकेच्या कमाईची आकडेवारीस्टेट बँक ऑफ इंडियाच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर 2019 मध्ये ती 2,53,322 कोटी रुपये होती. यानंतर 2020 मध्ये बँकेची कमाई 2,69,851 कोटी रुपये झाली. 2021 मध्ये ती 2,78,115 कोटी रुपये आणि 2022 मध्ये ती 2,89,972 कोटी रुपयांवर पोहोचली. तर 2023 मध्ये ती 3,50,844 कोटी रुपये झाली आहे.

टॅग्स :स्टेट बँक आॅफ इंडियाव्यवसाय