Join us

SBIची योजना भारी, घर प्रकल्प पूर्ण होण्याची मिळणार हमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 07:06 IST

स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) गृहकर्जाची नवीन योजना सुरू केली आहे.

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) गृहकर्जाची नवीन योजना सुरू केली आहे. यात घर बांधणी प्रकल्प अपूर्ण राहण्यापासून खरेदीदारास संरक्षण मिळणार आहे. ‘रेसिडेन्शिअल बिल्डर फायनान्स विथ बायर गॅरंटी’ (आरबीबीजी) या नावाच्या या योजनेत एसबीआयकडून गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकास घर बांधणी प्रकल्प पूर्ण होण्याची पूर्ण हमी मिळणार आहे.एसबीआयचे चेअरमन रजनीश कुमार यांनी सांगितले की, या योजनेमुळे घर विकत घेणाऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल. कारण त्यांच्या कष्टाच्या पैशाला सुरक्षा मिळणार आहे, तसेच तणावाखाली असलेल्या रिअल इस्टेट क्षेत्राला चालना मिळण्यासही मदत मिळेल. बँकेकडून गृहकर्ज घेणा-यास घर बांधणी प्रकल्पास भोगवटा प्रमाणपत्र मिळेपर्यंत बँकेकडून हमी मिळेल. ही योजना खरेदीदार, बिल्डर व बँक या सर्वांच्याच हिताची आहे.

टॅग्स :एसबीआय