Join us  

विजय मल्ल्याला दणका; ६२०० कोटींचे शेअर्स विकून किंगफिशरची होणार कर्ज वसुली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 9:04 AM

vijay mallya : विजय मल्ल्याला जानेवारी २०१९ मध्ये कर्ज बुडवल्याप्रकरणी आणि बँकाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी देशातून पळून गेलेला गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देविजय मल्ल्याच्या मालकीची किंगफिशर एअरलाइन्स ही कंपनी ऑक्टोबर २०१२ पासून बंद आहे.किंगफिशरला देण्यात आलेले कर्ज हे २०१२ च्या शेवटी नॉन परफॉर्मिंग असेट (एनपीए) म्हणून जाहीर करण्यात आले होते.

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) नेतृत्वाखाली देशातील बँकाचा एक गट आर्थिक फसवणूक करुन पळून गेलेल्या विजय मल्ल्या याच्या तीन कंपन्यांमधील शेअर होल्डिंग विकून किंगफिशर विमान कंपनीला दिलेले ६२०० कोटींपेक्षा अधिक कर्जाची वसुली करणार आहे. यूनायटेड ब्रुवरीज लिमिटेड, यूनायटेड स्पिरिट्स लिमेटेड आणि मॅकडॉवेल होल्डिंग्स लिमिटेडमधील विजय मल्ल्याचे शेअर्स ब्लॉक डील्समध्ये २३ जून रोजी विकले जातील. विजय मल्ल्याच्या मालकीची किंगफिशर एअरलाइन्स ही कंपनी ऑक्टोबर २०१२ पासून बंद आहे.

दरम्यान, विजय मल्ल्याला जानेवारी २०१९ मध्ये कर्ज बुडवल्याप्रकरणी आणि बँकाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी देशातून पळून गेलेला गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले आहे. सध्या विजय मल्ल्या ब्रिटनमधील न्यायालयांमध्ये त्याला भारताच्या ताब्यात देण्याची जी मागणी करण्यात येत आहे. त्याविरोधात तो खटला लढत आहे. जर विजय मल्ल्याच्या मालकीच्या शेअर्सची विक्री झाली तर बँकाकडून किंगफिशर एअरवेज कर्ज प्रकरणामध्ये विजय मल्ल्याविरोधातील पहिली मोठी वसुली ठरणार आहे. किंगफिशरला देण्यात आलेले कर्ज हे २०१२ च्या शेवटी नॉन परफॉर्मिंग असेट (एनपीए) म्हणून जाहीर करण्यात आले होते. विजय मल्ल्याने मार्च २०१६ मध्ये भारतातून पळ काढला. १७ बँकांची फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

शेअर्सची विक्री डेट रिकव्हरी ट्रायब्यूनलच्या देखरेखीखाली होणारमनी कंट्रोलने काही कागदपत्रांच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार, या शेअर्सची विक्री बंगळुरुमधील डेट रिकव्हरी ट्रायब्यूनलच्या (DRT)देखरेखीखाली होईल. ज्यांनी रिकव्हरी अधिकाऱ्याला ६२०३ कोटी रुपयांच्या कर्जवसुलीसाठी शेअर्स विक्रीची जबाबदारी दिली आहे. जर ब्लॉक डीलमध्ये या शेअर्सची विक्री झाली नाही तर बँक बल्क किंवा रिटेल माध्यमातून शेअर्सची विक्री करु शकते. किंगफिशरला कर्ज देणाऱ्या बँकांच्या यादीमध्ये एसबीआयससोबतच पंजाब नॅशनल बँक, आयडीबीआय बँक, बँक ऑफ बडोदा, इलाहाबाद बँक, फेडरल बँक आणि अ‍ॅक्सेस बँकेचा समावेश आहे.

उधार घेतेलेल्या किंमतीपेक्षा अधिक संपत्ती जप्त केली - मल्ल्याचा दावाया प्रकरणामध्ये विजय मल्ल्याने गेल्या काही दिवसांपूर्वी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, असा असा दावा केला होता की,  जितके पैसे उधार घेतले आहेत त्यापेक्षा अधिक संपत्ती जप्त करण्यात आली आहे. तसेच, ट्विटद्वारे म्हटले होते की, "टीव्ही पाहत आहे आणि सतत माझ्या नावाचा उल्लेख फसवणूक करणारा असा केला जात आहे. किंगफिशर एअरलाइन्सकडे असणाऱ्या उधारीपेक्षा माझी अधिक संपत्ती ईडीने जप्त केली आहे, असे कोणाला वाटते नाही का? मी अनेकदा १०० टक्के उधारी परत करण्यासंदर्भात भाष्य केलेले नाही का? ही फसवणूक कोठे आहे?" असा सवाल विजय मल्ल्याने केला.

प्रकरण काय ?किंगफिशर एअरलाइन्स कर्ज प्रकरणात विजय मल्ल्या यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणाची ईडी आणि सीबीआय चौकशी करीत असतानाच विजय मल्ल्याने देशातून पलायन केले होते. बँका चालू तिमाहीतच मल्ल्या यांच्या मालकीच्या समभागांची विक्री करू शकतील. आपण बँकांना तडजोडीचे कित्येक प्रस्ताव दिले असल्याचा दावा विजय मल्ल्याने यापूर्वी केला आहे.न्यायालयाने म्हटले आहे की, विजय मल्ल्या निर्दोष असल्याचे सिद्ध झाल्यास मालमत्ता पुन्हा त्यांच्या ताब्यात द्याव्यात. त्याआधी बंगळुरूच्या ऋण वसुली प्राधिकरणाने बँकांना विजय मल्ल्या याच्या मालमत्ता विकण्याची परवानगी दिली होती. 

टॅग्स :विजय मल्ल्याव्यवसाय