Join us

SBI ने लाँच केले 'नेशन फर्स्ट ट्रान्झिट कार्ड'! मेट्रो, बस आणि पार्किंगचे पेमेंट एकाच कार्डद्वारे करता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 18:27 IST

स्टेट बँक ऑफ इंडियाने 'नेशन फर्स्ट ट्रान्झिट कार्ड' लाँच केले आहे. याचा ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.

देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने 'नेशन फर्स्ट ट्रान्झिट कार्ड' (Nation First Transit Card) लाँच केले आहे. या SBI कार्डद्वारे ग्राहक मेट्रो, बस आणि पार्किंग यांसारख्या अनेक गोष्टींसाठी डिजिटल तिकिटासाठी सहज पैसे देऊ शकतात. याचा अनेक ग्राहकांना फायदा होणार आहे. बँक ग्राहकांसाठी बँकिंग आणि दैनंदिन जीवन सुलभ करण्यासाठी सतत काम करत आहे.

टॅक्सीच्या भाड्यावरून चालकाशी वाद, भांडणातून आली व्यवसायाची कल्पना; भाविश अग्रवाल यांनी सुरू केली OLA

हे कार्ड RuPay आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड तंत्रज्ञानावर आधारित आहे. राष्ट्रीय दृष्टीकोनातून हे कार्ड सादर करण्यात आले आहे. एसबीआयचे अध्यक्ष दिनेश कुमार खारा म्हणाले की, हे कार्ड राष्ट्रीय दृष्टीकोनातून सादर करण्यात आले आहे. यामुळे वाहतुकीचा अनुभव बदलण्यास मदत होईल. आम्हाला असे कार्ड सादर करताना अभिमान वाटतो जे केवळ ग्राहकांचे जीवन सोपे करत नाही तर देशाच्या विकासातही योगदान देते, असंही ते म्हणााले. 

एसबीआयने सांगितले की, NCMC आधारित तिकीट समाधान MMRC मेट्रो लाइन 3 आणि आग्रा मेट्रोमध्ये देखील लागू केले जात आहे. SBI ने २०१९ मध्ये ट्रान्झिट ऑपरेटरसह NCMC कार्यक्रमात भाग घेतला. यानंतर एसबीआयने ‘सिटी १ कार्ड’, ‘नागपूर मेट्रो एमएचए कार्ड’, ‘मुंबई १ कार्ड’, ‘गोस्मार्ट कार्ड’ आणि ‘सिंगारा चेन्नई कार्ड’ सुरू केले.

टॅग्स :एसबीआयबँक