Join us  

SBI Home Loan: अच्छे दिन संपले! एप्रिल उजाडताच SBI चा जोरदार दणका; गृहकर्जावरील व्याजदर वाढविले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2021 12:35 PM

State Bank of India hiked Home loan by 25 basis points : महत्वाचे म्हणजे स्टेट बँक ही अशी बँक आहे जी आरबीआयने रेपो दरात कपात केली की लगेचच व्याजदर कमी करते. इतर बँका याचा फायदा खूप कमीवेळा ग्राहकांना देतात. आता या बँकेने व्याजदर वाढविल्याने याचा फटका नवीन होम लोन घेणाऱ्यांना बसणार आहे.

भारताची सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँकेने (State Bank of India) होम लोनवरील (Home Loan) वरील कमीतकमी व्याजदरात (Minimum Interest Rate) वाढ केली आहे. SBI च्या वेबसाईटनुसार हा व्याजदर आता 6.70 टक्क्यांवरून 6.95 टक्के झाला आहे. हा नवा दर (New Interest rate) 1 एप्रिल 2021पासून लागू करण्यात आला आहे. (State Bank of India (SBI) has hiked the minimum interest rate on home loans by 25 basis points (bps) from 6.70 per cent to 6.95 per cent with effect from April 1, 2021.)

महत्वाचे म्हणजे स्टेट बँक ही अशी बँक आहे जी आरबीआयने रेपो दरात कपात केली की लगेचच व्याजदर कमी करते. इतर बँका याचा फायदा खूप कमीवेळा ग्राहकांना देतात. आता या बँकेने व्याजदर वाढविल्याने याचा फटका नवीन होम लोन घेणाऱ्यांना बसणार आहे. एसबीआयने (SBI) व्याज वाढविल्याने गृहकर्ज महागणार आहे. एसबीआयने कमीतकमी व्याजदरामध्ये 25 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. म्हणजेय 0.25 टक्क्यांनी व्याज दर वाढविला आहे. यामुळे भविष्यातही होम लोन महाग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

स्टेट बँकेने गेल्या मार्चमध्ये स्पेशल ऑफर देत 6.70 टक्क्यांनी कर्ज उपलब्ध केले होते. हा व्याजदर सर्वात कमी होता. आता एसबीआयने व्याजदर कमी केल्याने अन्य़ बँकाही दरवाढीच्या पावलावर पाऊल ठेवून व्याजदर वाढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

एसबीआय काय म्हणते...एसबीआयच्या वेबसाईटनुसार होम लोन एक्सटर्नल बेंचमार्क-लिंक्ड रेट (EBLR) पेक्षा 40 बेसिस पॉईंटनी अधिक उपलब्ध आहे. EBLR  हा आरबीआयच्या रेपो रेटवर जोडलेला आहे. तो सध्या 6.65 टक्के आहे. म्हणजेच सध्या होम लोन 7 टक्क्यांवर उपलब्ध आहे. जर लोन प्रपोजलमध्ये अर्जदार महिला असेल तर 5 बीपीएसची सूट दिली जाते. यामुळे हे लोन 6.95 टक्के व्याजदरावर होते. याशिवाय बँक लोनची प्रोसेसिंग फी देखील घेणार आहे. जी लोन रकमेच्या 0.40 टक्के आणि जीएसटी अशी असणार आहे. कमीतकमी 10000 रुपये आणि अधिकाधिक 30000 रुपये असणार आहे.

टॅग्स :एसबीआयस्टेट बँक आॅफ इंडियाघर