Join us

SBI नं आपल्या कोट्यवधी ग्राहकांना दिला दिलासा, MLCR केला कमी; EMI चा भार कमी होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 13:35 IST

SBI Home Loan Rate: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) नवीन वर्षात कोट्यवधी ग्राहकांना दिलासा दिलाय. एसबीआयनं नवीन कर्जाचे व्याजदर (MLCR) जाहीर केलेत.

SBI Home Loan Rate: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) नवीन वर्षात कोट्यवधी ग्राहकांना दिलासा दिलाय. एसबीआयनं नवीन कर्जाचे व्याजदर (MLCR) जाहीर केलेत. एमसीएलआर हा असा दर आहे ज्यापेक्षा कमी व्याजदरात बँक ग्राहकाला कर्ज देऊ शकत नाही. एमसीएलआरमध्ये घट किंवा वाढ झाली तर त्याचा परिमाम ग्राहकांवर होतो. म्हणजेच होम लोन, पर्सनल लोन, कार लोनच्या ईएमआयवर याचा थेट परिणाम होतो. हे नवे दर १५ जानेवारी २०२५ पासून लागू झाले आहेत.

एसबीआयने एमसीएलआर दरात अजिबात वाढ केलेली नाही. तो पूर्वीच्या दरांवर कायम आहे. एसबीआयचा बेस लेंडिंग रेट एमसीएलआर ८.२० ते ९.१० टक्के आहे. ओव्हरनाईट एमसीएलआर दर ८.२० टक्के आहे. एमसीएलआरचा थेट परिणाम तुमच्या होम आणि कार लोनच्या ईएमआयवर होतो. 

एमसीएलआर चे दर वाढल्याने नवीन कर्जे महाग होतात. तसंच तुमच्या होम आणि कार लोनचा ईएमआय वाढतो. जर तुमचा एमएलसीआर कमी झाला तर ईएमआय कमी होतो. एक महिन्याचा एमएलसीआर ८.२० टक्क्यांवर कायम आहे. तर दुसरीडे तीन महिने, सहा महिने आणि एका वर्षाचा एमएलसीआर अनुक्रमे ८.५५ टक्के, ८.९० टक्के आणि ९.०५ टक्क्यांवर कायम आहे. दोन वर्षांचा एमएलसीआर ९.०५ टक्क्यांवरून ८.०५ टक्के करण्यात आलाय. तर ३ वर्षांचा एमएलसीआर ९.१० टक्क्यांवर कायम आहे.

टॅग्स :एसबीआयबँक