Join us

Big update for SBI customers: स्टेट बँकेत आता मोफत फाईल करता येणार ITR; पाहा काय आहे प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 15:24 IST

SBI Customers ITR Return : स्टेट बँकेत ग्राहकांना मोफत फाईल करता येणार इन्कम टॅक्स रिटर्न.

ठळक मुद्देस्टेट बँकेत ग्राहकांना मोफत फाईल करता येणार इन्कम टॅक्स रिटर्न.

काही दिवसांपूर्वीच इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याच्या अंतिम तारखेला मुदतवाढ देण्यात आली. दरम्यान, सध्या अनेकांचे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणं शिल्लक आहे. अशा परिस्थितीत स्टेट बँकेनं ग्राहकांसाठी मोठी सुविधा आणली आहे. त्यानुसार आता करदात्यांना YONO अॅपवरून Tax2Win आपला आयटीआर (ITR) दाखल करता येणार आहे. यासाठी केवळ पाच कागदपत्रांची आवश्यकता आहे. 

"तुम्हाला आयटीआर फाईल करायचा आहे का? तर तुम्ही योनोवर Tax2Win सोबत तो मोफत दाखल करू शकता. यासाठी तुम्हाला केवळ पाच कागदपत्रांची आवश्यकता आहे." अशा आशयाचं ट्वीट स्टेट बँकेनं केलं आहे. करदात्यांना यासाठी पाच कागदपत्रे सांभाळून ठेवण्याची आवश्यकता आहे. ती कागदपत्रे म्हणजे पॅन कार्ड, कर कापल्याची कागदपत्रे, आधार कार्ज. व्याज-उत्पन्नाचं प्रमाणपत्र, फॉर्म १६ आणि कर बचतीसाठी गुंतवणुकीचं प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. करदात्यांना केवळ १९९ रूपयांमध्ये ECS मदत मिळेल आणि याचा लाभ ३१ ऑक्टोबर पर्यंतच घेता येणार आहे. करदात्यांना आयटीआर मोफत फाईल करण्यासाठी योनो अॅपमध्ये जाऊन शॉप अँड ऑर्डरवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर टॅक्स अँड इन्व्हेस्टमेंटमध्ये जाऊन टॅक्स2विन वर लॉग इन करावं लागेल.

टॅग्स :एसबीआयइन्कम टॅक्स