नवी दिल्लीः स्टेट बँक ऑफ इंडियानं 'एसबीआय कार्ड पे'ची सुविधा लाँच केली आहे. या सुविधेच्या माध्यमातून ग्राहकाला मोबाइल फोनद्वारे पॉइंट ऑफ सेल (Pos)वर कॉन्टॅक्टलेस पेमेंट करता येणार आहे. 'एसबीआई कार्ड पे' अॅपमधून पॉइंट ऑफ सेल (Pos)वर टॅप केल्यानंतर पेमेंट होणार आहे. यासाठी आपल्याला क्रेडिट कार्ड जवळ बाळगणं आणि पिन टाकण्याची गरज लागणार नाही.
बँकेनं सांगितलं की, भारतात हा पहिलाच प्रयोग असून, आम्ही पेमेंट सोल्युशन दिलं आहे. एसबीआय कार्ड मोबाइल अॅपचा भाग आहे. ज्या माध्यमातून ग्राहकाला बऱ्याच सुविधा मिळणार आहेत. ग्राहक क्रेडिट कार्ड अकाऊंट योग्य पद्धतीनं हाताळण्याबरोबरच कॉन्टॅक्टलेस पेमेंटही करू शकणार आहे. एसबीआय कार्डचे एमडी आणि सीईओ हरदयाल प्रसाद म्हणाले, एसबीआय कार्ड ग्राहकांना त्यांच्या इच्छेनुसार व्यवहार करण्याची मुभा देणार आहे. तर इतर काही अॅप ग्राहकांना 2 हजार रुपये प्रतिव्यवहार आणि दररोज 10 हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार करण्याची परवानगी देते.