Join us  

दररोज 55 रुपये वाचवून काढा 10 लाखांचा विमा, पोस्टाची सुपरहिट योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 12:56 PM

तुम्हाला तर माहितीच असेल महिन्याभरात पोस्ट ऑफिसची बँक लाँच होणार आहे. परंतु तुम्हाला माहीत आहे का, पोस्ट ऑफिस तुम्हाला विमा संरक्षणही देतो.

नवी दिल्ली- तुम्हाला तर माहितीच असेल महिन्याभरात पोस्ट ऑफिसची बँक लाँच होणार आहे. परंतु तुम्हाला माहीत आहे का, पोस्ट ऑफिस तुम्हाला विमा संरक्षणही देतो. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण भारतात जेव्हा ब्रिटिशांची सत्ता होती तेव्हा 1 फेब्रुवारी 1884ला Postal Life Insurance ही योजना ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. सद्यस्थितीत PLI (Postal Life Insurance) योजनेंतर्गत 43 लाखांहून अधिक पॉलिसी होल्डर आहेत. या योजनेंतर्गत तुम्ही 10 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळवू शकता. वर्षं 1894मध्ये या योजनेंतर्गत पोस्टल अँड टेलिग्राफ विभागाशी संबंधित असलेल्या महिला कर्मचा-यांना विमा संरक्षण देण्यात आलं होतं. त्या काळात इतर कोणतीही कंपनी महिलांना विमा संरक्षण देत नव्हती. पोस्ट ऑफिसनं PLI अंतर्गत दोन प्रकारचे प्लॅन ग्राहकांना उपलब्ध करून दिले होते. Whole Life Assurance (Surksha): PLIच्या या योजनेला सुरक्षेच्या नावानंही ओळखलं जातं. या योजनेंतर्गत विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्याचा बोनस आणि निश्चित रक्कम त्याच्या उत्तराधिका-याला मिळते. या योजनेसाठी कमीत कमी 19 ते जास्तीत जास्त 55 वर्षांच्या व्यक्ती पात्र असतात. PLI या योजनेंतर्गत मर्यादित काळासाठी 20 हजार रुपयांपासून 10 लाखांपर्यंत तुम्ही रक्कम ठेवू शकता.Endowment Assurance (Santosh): Postal Life Insurance या योजनेला संतोष नावानंही ओळखलं जातं. या योजनेंतर्गत विमा संरक्षण धारकाला मर्यादित काळानंतर बोनससह त्यानं भरलेली रक्कम परत मिळते. विमा संरक्षण धारकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसदाराला ती रक्कम दिली जाते. 

टॅग्स :पोस्ट ऑफिस