Join us  

आनंदवार्ता! परीक्षेशिवाय मिळणार नोकरी; कोर्टात निघाली भरती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 10:13 AM

पोस्ट ऑफिस, सीआरपीएफ अशा अनेक विभागांत सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या संकटापायी देशात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक कंपन्यांना प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांनाही नोकरीवरून काढून टाकलं आहे. पण अशा परिस्थितीतही बऱ्याच सरकारी नोकऱ्या उपलब्ध होत आहे. फक्त त्यासाठी योग्य अर्ज आणि पात्रता हवी, अशांना ही सरकारी नोकरीही मिळू शकते. पोस्ट ऑफिस, सीआरपीएफ अशा अनेक विभागांत सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे.विशेष म्हणजे आता कायद्याचा अभ्यास केला असेल तर उच्च न्यायालयात आपल्याला सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. ही रिक्त जागांसाठी नोकरभरती अलाहाबाद उच्च न्यायालयाने(Allahabad High Court Law Clerk recruitment 2020) काढली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयातAllahabad High Court Law Clerk recruitment 2020)  कायदा लिपिक(LAW clerk)च्या 100हून अधिक जागांसाठी भरती होणार आहेत. यासाठी अधिसूचना जारी केली आहे.रिक्त पदांचा एकूण तपशील यासह एकूण पदे, निवड प्रक्रिया, अर्ज प्रक्रिया याची सर्व माहिती दिलेली आहे.  तसेच अर्ज करण्यासाठी उमेदवारांना संकेतस्थळाची माहितीही देण्यात आली आहे. पोस्ट नाव - कायदा लिपिक (LAW clerk)पदांची संख्या - १०२अर्ज माहितीअर्ज ऑफलाइन पद्धतीनं करावा लागणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 8 ऑगस्ट 2020 आहे. इच्छुक उमेदवार अलाहाबाद उच्च न्यायालय आणि लखनौ खंडपीठाकडून 300 रुपये भरून अर्जाचा फॉर्म खरेदी करू शकतात. किंवा आपण संकेतस्थळावरून अर्ज डाऊनलोड करून प्रिंट काढू शकता. त्यानंतर फॉर्मसह 300 रुपयांचा डिमांड ड्राफ्ट सादर करावा लागणार आहे. भरलेला अर्जाचा फॉर्म 8 ऑगस्ट 2020पर्यंत सर्व आवश्यक कागदपत्रांसह स्पीड पोस्ट, नोंदणीकृत पोस्ट किंवा कुरिअरच्या माध्यमातून पाठवावा लागणार आहे.आवश्यक पात्रताया पदांवर नोकरी मिळविण्यासाठी उमेदवारांनी एलएलबी उत्तीर्ण केले असणं गरजेचं आहे. उमेदवारांचे किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय 26 वर्षे असावे. आरक्षणानुसार जास्तीत जास्त वयोमर्यादा शिथिल केली जाईल. वय 1 जुलै 2020 पर्यंत ग्राह्य धरलं जाईलनिवड कशी होईललॉ लिपिकपदाच्या उमेदवारांची निवड केवळ मुलाखतीच्या आधारे केली जाईल. कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.

हेही वाचा

दररोज 3GB डेटा देणारे तीन कंपन्यांचे सर्वात स्वस्त प्लॅन; जाणून घ्या सर्वकाही

"सत्तेसाठी मोदी ताकदवान नेता असल्याची खोटी प्रतिमा पसरवली; आता तीच ठरतेय भारताची दुर्बलता"

भारतीय लष्कराची तयारी पाहून चीन बिथरला; तिबेटमध्ये बनवलं थेट 'उडतं हॉस्पिटल'

सरकारच्या 'या' योजनेत पाच वर्षांसाठी १ लाख गुंतवल्यावर मिळतोय मोठा लाभ, पैसेही राहणार सुरक्षित

...अन् कॅलिबर क्षेपणास्त्रांनी सुसज्ज रशियन पाणबुडी गेली ब्रिटनच्या युद्धनौकेजवळून; नाटो देशांमध्ये पसरली भीती  

टॅग्स :नोकरी