Join us  

नमकीन खाद्यपदार्थांच्या बाजारपेठेत नॅशनल ब्रॅण्डना पसंती, दरवर्षी होतेय २४ टक्क्यांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 6:21 AM

देशातील खाद्यपदार्थांची बाजारपेठ खूपच मोठी असून, ती वर्धनशीलही आहे.

मुंबई : देशातील खाद्यपदार्थांची बाजारपेठ खूपच मोठी असून, ती वर्धनशीलही आहे. राज्यातील ग्राहकांना ताज्या, कुरकुरीत आणि मसालेदार पदार्थांसहीत चवदार नमकीन पदार्थांना मागणी असलेली दिसून येत आहे. चिवडा, फरसाण अशा पारंपरिक खाद्यपदार्थांबरोबरच नमकीनही लोकप्रिय होत आहे. काही काळापूर्वी वापरल्या जाणाऱ्या स्थानिक पदार्थांची जागा नंतर प्रादेशिक ब्रॅण्डेड पदार्थांनी घेतली, तर आता राष्टÑीय ब्रॅण्डस्ची बाजारपेठ तेजीत असल्याचे दिसत आहे. खाद्यपदार्थांच्या बाजारपेठेमध्ये दरवर्षी सुमारे २४ टक्क्यांनी वाढ होत असल्याचेही आढळून आले आहे.‘लोकमत’च्या टीमने राज्याच्या विविध भागांमधील ग्राहकांचीभेट घेऊन त्यांच्या खाद्यसंस्कृतीची माहिती, त्याबाबतच्या त्यांच्या सवयी आणि ते वापरत असलेल्या विविध ब्रॅण्डस्ची माहिती करून घेतली. त्यामधून हाती आलेल्या निष्कर्षांचे सार यामधून मांडण्यात आले आहे.बाजारात मिळणारे विविध खाद्यपदार्थ हा आपल्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ताजे, कुरकुरीत, चवदार आणि मसालेदार पदार्थांना ग्राहकांची पसंती लाभत असल्याचे आमच्या टीमने केलेल्या सर्वेक्षणामध्ये आढळून आले आहे. ७२ टक्के ग्राहकांना या पदार्थांचा ताजेपणा महत्त्वाचा वाटतो, तर ६७ टक्के लोकांची पसंती कुरकुरीतपणाला आहे. अनुक्रमे ५३ आणि ५२ टक्के ग्राहकांनी मसालेदार, तसेच चांगल्या चवीला पसंती दर्शविली आहे.बहुसंख्य ग्राहक हे लोकप्रिय स्थानिक ब्रॅण्डचे पदार्थ खरेदी करीत असले, तरी आता त्यांच्या पसंतीमध्ये काही प्रमाणामध्ये बदल दिसून येत आहे. स्थानिक ब्रॅण्डऐवजी आता प्रादेशिक, तसेच राष्टÑीय ब्रॅण्डस्च्या पदार्थांची खरेदी केली जात आहे. मात्र, ब्रॅण्डेड पदार्थांनाच मोठी मागणी असल्याचे आढळून येत आहे.हलदीराम्स, बालाजी आणि चितळे बंधू हे बाजारपेठेमधील सर्वाधिक लोकप्रिय असलेले काही स्थानिक ब्रॅण्ड आहेत. याशिवाय अंकल चिप्स, पार्ले, पतंजली या ब्रॅण्डसची खरेदीही नियमितपणे केली जाते. विशेष म्हणजे आरोग्यासाठी उपयुक्त असणाºया खाद्यपदार्थांच्याटू यम, सूरज खाकरा, रोस्टेड मखना, पंजवानी शेंगदाणा या ब्रॅण्डसचा उल्लेखही अनेक ग्राहकांनी आवर्जून केला.सर्वसाधारणत: ग्राहक एकाच वेळी दोन-तीन वेगवेगळ्या ब्रॅण्डसची खरेदी करतात आणि त्यामधून जो ब्रॅण्ड त्यांना अधिक पसंत पडतो, त्याची खरेदी नियमितपणे होताना आपल्याला दिसून येते.

 

टॅग्स :व्यवसायभारत