Join us

वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 10:37 IST

एका स्टाफिंग एजन्सीनं हाऊस मॅनेजरच्या दोन पदांसाठी जाहिरात दिलीये. या नोकरीत मिळणारा पगार ऐकून लोक आश्चर्यचकित झालेत.

Housemaid for Middle East:  दुबईतील एक स्टाफिंग एजन्सी सध्या जोरदार चर्चेत आहे. या स्टाफिंग एजन्सीनं हाऊस मॅनेजरच्या दोन पदांसाठी जाहिरात दिलीये. या नोकरीत मिळणारा पगार ऐकून लोक आश्चर्यचकित झालेत. काही लोक तर आपली नोकरी सोडून ही नोकरी करण्याविषयी गमतीनं बोलत आहेत.

रॉयल मॅसन नावाची ही एजन्सी आहे. ही एजन्सी मीडल ईस्टमधील शाही कुटुंबासाठी कर्मचाऱ्यांची भरती करते. रॉयल मॅसननं अलीकडेच व्हीआयपी ग्राहकांसाठी अबू धाबी आणि दुबईमध्ये दोन नोकऱ्यांची जाहिरात दिली आहे. ही एजन्सी हाऊस मॅनेजर पदांसाठी खूप चांगलं वेतन देत आहे. पगार दरमहा ३०,००० दिरहम म्हणजेच सुमारे ७ लाख रुपये आहे.

PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित

इन्स्टावर दिली माहिती

रॉयल मॅसननं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये यासंदर्भातील माहिती दिली आहे. 'आम्ही कुशल आणि समर्पित पूर्णवेळ हाऊस मॅनेजरच्या शोधात आहोत. या पदासाठी दरमहा ३०,००० दिरहम असं आकर्षक वेतन मिळेल. आम्हाला उद्योगातील सर्वोत्तम लोकांना आमच्याकडे आकर्षित करायचं आहे, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलंय.

भारतातील अनेक नोकऱ्यांपेक्षा सर्वोत्तम पॅकेज

दरमहा ३० हजार दिरहम म्हणजे सुमारे ७ लाख रुपये. त्यानुसार वार्षिक पॅकेज सुमारे ८४ लाख रुपये असेल. ही रक्कम भारतातील अनेक टेक आणि फायनान्स प्रोफेशनल्सच्या कमाईपेक्षा जास्त आहे. यूएईमध्येही देशांतर्गत पदांसाठी हा पगार खूप जास्त मानला जातो.

काय करायचंय काम?

निवड झालेल्या उमेदवारांना आलिशान घरात काम पहावं लागेल. त्यांना स्टाफिंगवर देखरेख ठेवावी लागते, मेंटेनन्स आणि बजेटिंगची काळजी घ्यावी लागते. त्याचबरोबर घरातील सेवेचा स्तर नेहमीच उच्च राहील, याची ही काळजी घ्यावी लागते. अर्ज करणाऱ्यांना लक्झरी घरं हाताळण्याचा अनुभव असावा, असं कंपनीनं आपल्या जाहिरातीमध्ये नमूद केलंय.

काही लोकांना या ऑफरबद्दल साशंकता होती. त्यामुळेच ही ऑफर खरी असल्याचं एजन्सीनं म्हटलंय. एजन्सीनं इच्छुकांना त्यांचे सीव्ही थेट पाठविण्यास सांगितलं आहे. ज्यांना चांगल्या पगाराची नोकरी करायची आहे त्यांच्यासाठी ही नोकरी खूप चांगली आहे. लक्झरी घरं हाताळण्याचा अनुभव असेल अशी व्यक्ती यासाठी अर्ज करू शकते.

टॅग्स :दुबईनोकरी