Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिस्क घेतली अन् गुंतवणूक वाढली! इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत २१ टक्क्यांनी वाढ; सलग तीन महिन्यांच्या घसरणीला ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 09:43 IST

गोल्ड ईटीएफची चमक पडली फिकी; या उद्योगातून होणार सात लाखांहून अधिक नवी रोजगारनिर्मिती

नवी दिल्ली : शेअर बाजारातील उत्साहवर्धक वातावरण आणि गुंतवणूकदारांचा वाढलेला आत्मविश्वास यामुळे इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये नोव्हेंबरमध्ये तब्बल २९,९११ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. ऑक्टोबरच्या तुलनेत यात २१ टक्के वाढ आहे. सलग तीन महिन्यांच्या घसरणीनंतर इक्विटी फंडांनी पुन्हा जोरदार वाढ अनुभवली.

परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये

उद्योग संघटना ॲम्फीने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, इक्विटी फंडांमध्ये गुंतवणूक वाढल्यामुळे म्युच्युअल फंड उद्योगाचे एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) ऑक्टोबरच्या ७९.८७ लाख कोटी रुपयांवरून नोव्हेंबरमध्ये ८०.८० लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. हा एक नवा उच्चांक आहे. सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) द्वारे यावेळी गुंतवणूक काही प्रमाणात कमी झाली आहे.

उद्योग प्रचंड वाढणार

२०३५ पर्यंत म्युच्युअल फंड उद्योगाची मालमत्ता (एयूएम) तब्बल ३०० लाख कोटी रुपयांवर जाण्याचा अंदाज आहे. प्रत्यक्ष इक्विटी गुंतवणूकही वाढून २५० लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

सध्या भारतीय कुटुंबांमध्ये म्युच्युअल फंडांची पोहोच सुमारे १० टक्के आहे. पुढील दशकात ही पोहोच २० टक्केपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. सात लाखांहून अधिक नवी रोजगारनिर्मिती उद्योगामुळे होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Risk Paid Off: Equity Mutual Fund Investments Surge 21%!

Web Summary : Equity mutual funds saw a 21% jump in November, fueled by positive market sentiment. Investments reached ₹29,911 crore, breaking a three-month decline. Industry assets hit a record ₹80.80 lakh crore, anticipating further growth to ₹300 lakh crore by 2035.