Retirement Planning : वयाची चाळीशी हा माणसाच्या आयुष्यातील असा टप्पा असतो, जिथे कारकीर्द शिखरावर असते पण जबाबदाऱ्यांचा डोंगरही तेवढाच मोठा असतो. मुलांचे शिक्षण, गृहकर्जाचे हप्ते, वृद्ध पालकांचे आरोग्य आणि वाढती महागाई अशा चौफेर आघाड्यांवर लढताना अनेकजण आपल्या 'निवृत्ती' नियोजनाकडे दुर्लक्ष करतात. पण लक्षात ठेवा, निवृत्तीनंतरचे आयुष्य सन्मानाने जगण्यासाठी चाळीशीत केलेली गुंतवणूक हाच तुमचा खरा आधार ठरणार आहे.
१. तुमची आर्थिक स्थिती नेमकी काय?नियोजनाची पहिली पायरी म्हणजे तुमच्या सध्याच्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा ताळेबंद मांडणे. महागाईचा दर, भविष्यातील वैद्यकीय खर्च आणि तुमची जीवनशैली यांचा विचार करून निवृत्तीनंतर तुम्हाला नेमकी किती रक्कम लागेल, याचा अचूक अंदाज बांधा.
२. निवृत्तीला द्या प्रथम प्राधान्यचाळीशीनंतर वेळ कमी आणि उद्दिष्ट मोठे असते. त्यामुळे नॅशनल पेन्शन सिस्ट आणि ईपीएफ सारख्या योजनांमध्ये गुंतवणूक वाढवा. तुमच्या एकूण उत्पन्नाच्या किमान १५ ते २५ टक्के हिस्सा केवळ निवृत्तीसाठी बाजूला काढण्याचा प्रयत्न करा.
३. महागड्या कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडाक्रेडिट कार्ड लोन किंवा पर्सनल लोनवर १२ ते २४ टक्के व्याज द्यावे लागते, जे तुमच्या संपत्तीसाठी घातक आहे. ही कर्जे लवकरात लवकर संपवा. गृहकर्ज सुरू असेल तरीही जमेल तसे त्याचे 'प्री-पेमेंट' करून मुद्दल कमी करण्यावर भर द्या.
४. 'इमर्जन्सी फंड' विसरू नकानिवृत्तीच्या बचतीला धक्का लागू नये म्हणून किमान ६ ते ९ महिन्यांच्या खर्चाएवढी रक्कम इमर्जन्सी फंड म्हणून ठेवा. ही रक्कम सेव्हिंग अकाऊंट किंवा लिक्विड फंडमध्ये असावी, जेणेकरून संकटाच्या वेळी ती तत्काळ उपलब्ध होईल.
५. टॅक्स प्लॅनिंग म्हणजे अधिक बचतकलम ८०सी, एनपीएस आणि हेल्थ इन्शुरन्सच्या माध्यमातून कर वाचवा. कराची जेवढी बचत होईल, तेवढी तुमची गुंतवणूक करण्याची क्षमता वाढेल.
६. विमा: सुरक्षेचे कवचपुरेशा रकमेचा 'टर्म लाईफ इन्शुरन्स' आणि 'हेल्थ इन्शुरन्स' असणे अनिवार्य आहे. वाढत्या वयानुसार आरोग्य विमा पॉलिसीची वेळोवेळी समीक्षा करा, जेणेकरून गंभीर आजारांच्या वेळी तुमची आयुष्यभराची पुंजी खर्च होणार नाही.
वाचा - सिल्व्हर ईटीएफ २० टक्क्यांनी आपटले, गोल्डमध्येही मोठी घसरण; कमोडिटी बाजारात खळबळ
७. मुलांचे शिक्षण विरुद्ध तुमची निवृत्तीमुलांच्या उच्च शिक्षणासाठी गुंतवणूक करणे गरजेचे आहे, पण आपल्या निवृत्तीच्या निधीला कात्री लावून नव्हे! शिक्षणासाठी कर्ज मिळू शकते, पण निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी कोणीही कर्ज देत नाही. त्यामुळे मुलांचे शिक्षण आणि स्वतःची निवृत्ती यामध्ये सुवर्णमध्य साधा.
Web Summary : In your 40s? Prioritize retirement savings! Boost investments in NPS/EPF, clear debts, build an emergency fund, utilize tax planning, secure insurance, and balance children's education with your retirement needs for a comfortable future.
Web Summary : चालीसवें दशक में हैं? सेवानिवृत्ति बचत को प्राथमिकता दें! एनपीएस/ईपीएफ में निवेश बढ़ाएं, कर्ज चुकाएं, आपातकालीन निधि बनाएं, कर योजना का उपयोग करें, बीमा सुरक्षित करें, और बच्चों की शिक्षा को अपनी सेवानिवृत्ति की जरूरतों के साथ संतुलित करें।