Join us  

व्यापार निर्बंधामुळे अस्वस्थ चीन वाणिज्य मंत्रालयाच्या दारात, थेट परकीय गुंतवणुकीवर निर्बंध कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 3:19 AM

भारतीय बाजारपेठेचे महत्त्व असल्यानेच चिनी शिष्टमंडळ आता वाणिज्य मंत्रालयाकडे वेळ मागत आहे.

नवी दिल्ली : गलवान खोऱ्यातून मागे हटणाºया चीनने आता पुन्हा भारताशी जुळवून घेण्याची कूटनीती आखली आहे. जुलैअखेर चिनी दूतासावातील वाणिज्य व व्यापार विभागाचे वरिष्ठ अधिकारी भारतीय वाणिज्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. सीमेलगतच्या देशांवर थेट परकीय गुंतवणुकीसाठी भारताने कठोर निर्बंध एप्रिलपासून लादले होते. तेव्हाही ड्रॅगन अस्वस्थ झाला होता. चिनी दूतावासाने हा एक प्रकारे अन्याय असल्याचे रडगाणे गायले होते. लडाख सीमेवर हिंसक झटापटीनंतर चिनी अ‍ॅपवर बंदी घालून भारताने चीनला मोठा दणका दिला, तर विस्तारवादाचा आरोप करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा अमेरिकेनंतर चीनला सुनावले. आता मात्र चीनला ढासळत्या अर्थव्यवस्थेची चिंता आहे. भारतीय बाजारपेठेचे महत्त्व असल्यानेच चिनी शिष्टमंडळ आता वाणिज्य मंत्रालयाकडे वेळ मागत आहे.अद्याप व्हर्च्युअल भेटीची वेळ ठरली नाही; परंतु भारताने कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणावर घातलेल्या निर्बंधाचा मोठा फटका चीनला बसला आहे.टिकटॉक चिनी अ‍ॅपवर बंदी घातल्याचा फटकाही त्या कंपनीला बसला. भारतातील कार्यालयाने चिनी सरकारसमवेत वापरकर्त्यांच्या माहितीची देवाण-घेवाण करीत नसल्याचे सांगितले. मात्र, चीनमधील कायद्यानुसार तेथील कंपनीच्या व्यवस्थापन मंडळावर चिनी कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य असणे बंधनकारक असते. या मुद्यावरून भारत चिनी कंपन्यांची कोंडी करीत आहे.दरम्यान, दोन्ही देशांचे सैनिक आपापल्या हद्दीत टप्प्याटप्प्याने मागे सरकत आहेत. लष्करी व राजनैतिक स्तरावरील चर्चा सोमवारपासून पुन्हा सुरू होईल. सीमेवर कमांडर, तर राजनैतिक चर्चेत संयुक्त सचिव दर्जाचे अधिकारी दोन्ही बाजूंनी सहभागी होत आहेत. सीमेवर तणाव कमी होत असला तरी मलबार युद्ध नौका सरावात आता भारत, जपान व आॅस्ट्रेलियासमवेत दक्षिण चीन समुद्रात अमेरिकाही सहभाही होणार असल्याने ड्रॅगन अस्वस्थ झाला आहे.२२ अ‍ॅपाचे, १५ चिनूक हेलिकॉप्टर दाखललडाख सीमेवर चीनशी खणाखणी सुरू असतानाच अमेरिकेकडून घेतलेली २२ अ‍ॅपाचे व १५ चिनूक हेलिकॉप्टर उपलब्ध झाल्याने हवाईदलाचे बळ वाढले आहे. एएच- ६४ ई अ‍ॅपाचे ही प्रचंड ताकदीची लढाऊ हेलिकॉप्टर आहेत, तर सीएच-४७ एफ चिनूक हे हेलिकॉप्टर्स प्रचंड वजन घेऊन उंच उड्डाण करू शकतात. ही दोन्ही हेलिकॉप्टर्स अमेरिकेच्या बोर्इंग कंपनीकडून घेण्यात आली आहेत. २२ पैकी शेवटची पाच अ‍ॅपाचे हेलिकॉप्टर्स कंपनीने हरयाणातील हिंडोन हवाईतळावर हवाईदलाकडे सुपूर्द केली.१५ पैकी शेवटची पाच चिनूक हेलिकॉप्टर गेल्या मार्चमध्ये दाखल झाली होती. सध्या वापरात असलेल्या एमआय ३५ लढाऊ हेलिकॉप्टरची जागा अ‍ॅपाचे हेलिकॉप्टर घेतील. गलवान खोºयात चीनसोबत झालेल्या संघर्षानंतर हवाईदलाने सीमेवरील आपली ताकद वाढविण्यासाठी सुखोई ३०, मिग २९ व मिराज २००० या लढाऊ विमानांसोबत अ‍ॅपाचे हेलिकॉप्टर्सही याआधीच तैनात केली आहेत.पराभवाची आठवण करून देणाराचीन म्हणतो -दोन्ही देश समानगलवान खोºयावर हक्क सांगणाºया ड्रॅगनचा आवाज आता नरमला आहे. वारंवार १९६२ च्या युद्धाची आठवण करून देणाºया चीनने दोन्ही देश समान आहेत, असे सांगून लडाख सीमेवरील झटापटीची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.चिनी राजदूत सन वोई दुंग यांनी सीमावादावर सध्या सुरू असलेल्या यशस्वी द्विपक्षीय चर्चेवर विस्तृत भूमिका मांडली. राजदूत म्हणाले, दोन्ही देशांनी परस्परांना सहकार्य करावे. सन्मान करावा.एकमेकांना अजून चांगल्या प्रकारे समजून घ्यावे. शांततापूर्ण चर्चा करून दोन्ही देश समाधानी होतील, असाच तोडगा काढायला हवा.

टॅग्स :चीनभारतभारत-चीन तणावचिनी ऍप