Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोविडनंतर रिझर्व्ह बँकेचा नफा वाढला; अमेरिका-युरोपियन देशांमधील बँका मात्र आजही तोट्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 09:38 IST

कोविड साथीनंतर हळूहळू स्थिती पू्र्वपदावर येत आहे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कोविड साथीनंतर हळूहळू स्थिती पू्र्वपदावर येत असताना बहुतांश प्रगत अर्थव्यवस्थांच्या मध्यवर्ती बँकांचा ताळेबंद आजही कोलमडलेलाच आहे. बँका अजूनही तोट्यात आहेत. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने चलन व ताळेबंद व्यवस्थापनात नेत्रदीपक कामगिरी करीत  ३१ अब्ज डॉलरचा नफा कमावला आहे.

आरबीआयने करदात्यांच्या संरक्षणासाठी ६% जोखीम  बफर तयार केला आहे. अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह (फेड), युरोपियन सेंट्रल बँक (ईसीबी), बँक ऑफ इंग्लंड (बीओई) रिझर्व्ह बँक ऑफ ऑस्ट्रेलिया (आरबीए) आणि बँक ऑफ कॅनडा (बीओसी) नुकसान भरून काढण्यासाठी कोषागार वा करदात्यांवर अवलंबून असतानाच आरबीआय सरकारला मोठा लाभांश देत आहे. 

३१ अब्ज डॉलरचा निव्वळ नफा

आरबीआयचा ३१ अब्ज डॉलरचा निव्वळ नफा  आहे. कॅनडा व ऑस्ट्रेलियाच्या बँकांनी अनेक अब्ज डॉलर्सचा तोटा दाखवला. फेडरल रिझर्व्हचा एकत्रित तोटा ७७ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक तर बँक ऑफ इंग्लंडचे नुकसान ४० अब्ज डॉलर्सच्या जवळ पोहोचले आहे. फक्त भारत आणि जपान यांनी निव्वळ नफा दाखवला.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँक