Join us  

रिझर्व्ह बँकेचे 'मिशन २०-२०'; दिवाळीआधी २० रुपयाची नवी नोट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2018 9:59 AM

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून 20 रुपयांच्या या नोटेचे डिझाईन तयार करण्यात आले असून प्रिंटींग पेपरचे काम सुरू आहे. सध्या या नोटेच्या रंगावरुन गोंधळ असला तरी पहिल्या डिझाईनमध्ये गडद लाल रंगाची किनार असल्याची माहिती आहे.

नवी दिल्ली - नोटाबंदीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल झाले आहेत. तर रिझर्व्ह बँकेनेही बहुतांश नवीन नोटांचा भारतीय चलनात समावेश केला आहे. त्यानुसार, सर्वप्रथम, 500 आणि 2 हजारांच्या नव्या नोटा बाजारात आल्या. त्यानंतर, 200 रुपयांची, 50 रुपयांची, 10 रुपयांची आणि आता 100 रुपयांची नवीन नोट बाजारात आली आहे. आता, लवकरच 20 रुपयांचीही नवी नोट चलनात येणार आहे. दिवाळी पूर्वीच ही ट्वेटी-20 नोट आपल्याला पाहायला मिळू शकते, अशी सुत्रांची माहिती आहे. 

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून 20 रुपयांच्या या नोटेचे डिझाईन तयार करण्यात आले असून प्रिंटींग पेपरचे काम सुरू आहे. सध्या या नोटेच्या रंगावरुन गोंधळ असला तरी पहिल्या डिझाईनमध्ये गडद लाल रंगाची किनार असल्याची माहिती आहे. या नोटांवर महाराष्ट्राच्या औरंगाबाद येथील अजंठा लेण्यांचे छायाचित्र असणार आहे. त्यामुळे 20 रुपयांच्या नोटेवर महाराष्ट्राला स्थान मिळणार असल्याचे दिसून येते. मराठी माणसांसाठी आणि महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब आहे. जुन्या 20 रुपयांच्या नोटेपेक्षा नवीन 20 रुपयांची नोट आकाराने 20 टक्के कमी असणार आहे. इतर नोटांप्रमाणेच 20 रुपयांच्याही नोटेला अत्याधुनिक सुरक्षेसह बनविण्यात येत आहे. दरम्यान, 2016 च्या आरबीआयच्या वार्षिक अहवालातच या नोटांमध्ये होणाऱ्या बदलाचे संकेत देण्यात आले होते. या नोटेवरही स्वच्छ भारत मिशनचा लोगो असणार आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच भारतीयांना 20 रुपयांच्या नव्या नोटेसह ट्वेंटी-20 खरेदी करता येणार आहे. 

टॅग्स :निश्चलनीकरणभारतीय रिझर्व्ह बँकऔरंगाबाद