Join us

Punjab And Sindh Bank RBI : पंजाब अँड सिंध बँकेला झटका, रिझर्व्ह बँकेनं केली मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 10:51 IST

Punjab And Sindh Bank RBI : नियमांचं उल्लंघन केल्यानं रिझर्व्ह बँकेनं केली कारवाई.

Punjab And Sindh Bank RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पंजाब आणि सिंध बँकेला २७ लाख रुपयांपेक्षा अधिक दंड ठोठावला आहे. च्ण्बँकेने नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगत रिझर्व्ह बँकेने पंजाब अँड सिंध बँकेला हा दंड ठोठावला. पंजाब अँड सिंध बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यावर देण्यात आलेले उत्तर समाधानकारक नव्हतं आणि नियमांचे उल्लंघन केल्याचे ल्सिद्ध झाले. त्यामुळे बँकेला २७.५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, पंजाब आणि सिंध बँकेने बाह्य बेंचमार्क-आधारित कर्ज देण्याबाबत जारी केलेल्या काही निर्देशांचे पालन केले नाही. दरम्यान, बँकेने आपल्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा त्यांचा हेतू नसल्याचंही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले.

शेअरही घसरलाशुक्रवारी कामकाजाच्या च्अखेरच्या दिवशी हा शेअर १५.३० रुपयांच्या पातळीवर होता. एक दिवस आधीच्या तुलनेत शेअरची किंमत ०.९७ टक्क्यांनी घसरली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत पंजाब आणि सिंध बँकेचा नफा दुपटीने वाढून ३४६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार बुडीत कर्जे कमी झाल्यामुळे त्यांचा नफा वाढला आहे. पंजाब आणि सिंध बँकेने आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या याच तिमाहीत १६०.७९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकव्यवसाय