Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय रिझर्व्ह बँक ठरली जगात नंबर वन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2020 03:06 IST

ट्विटर हँडलचे फॉलोअर्स १० लाखांहून अधिक

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ट्विटर हँडलवरील फॉलोअर्सची संख्या १० लाखांच्या पुढे गेली आहे. फॉलोअर्सचा १० लाखांचा टप्पा पार करणारी पहिली आर्थिक संस्था बनण्याचा मान रिझर्व्ह बँकेला मिळाला आहे. अमेरिकेचे फेडरल रिझर्व्ह अथवा युरोपियन बँकेलाही याबाबत रिझर्व्ह बँकेने मागे टाकले, हे विशेष होय. 

२७ सप्टेंबर रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ट्विटर हॅण्डलचे फॉलोअर्स ९.६६ लाख होते. २२ नोव्हेंबर रोजी त्यांची संख्या १० लाख ५१३ झाली आहे. अन्य देशांच्या बँकांपेक्षा रिझर्व्ह बँकेने बऱ्याच विलंबाने (जानेवारी २०१२) आपले ट्विटर हॅण्डल सुरू केले आहे. मात्र तरीही त्यांचे फॉलोअर्स वेगाने वाढले असून, ते आता अव्वल क्रमांकावर आहेत. 

टॅग्स :मुंबईभारतीय रिझर्व्ह बँक