Join us  

आरबीआयने देशातील सर्वात मोठ्या बँकेला ठोठावला कोटींचा दंड, जाणून घ्या कारण....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 11:45 AM

reserve bank imposes rs 2 crore penalty on sbi : आरबीआयने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हा दंड आकारण्यात आला आहे.

ठळक मुद्देएसबीआयने आर्थिक स्थितीच्या संदर्भात 31 मार्च 2017 आणि 31 मार्च 2018 रोजीही माहिती दिली होती.

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बँक 'स्टेट बँक ऑफ इंडिया'ला (SBI) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. 16 मार्चला प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, एसबीआयने काही नियमांचे पालन केले नाही, त्यामुळे हा दंड आकारण्यात आला आहे. 15 मार्चला आदेश जारी करून आरबीआयने हा दंड आकारला आहे. (reserve bank imposes rs 2 crore penalty on sbi know what is the reason)

आरबीआयने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हा दंड आकारण्यात आला आहे. केंद्रीय बँकेच्या प्रसिद्धीपत्रानुसार, बँक नियमन कायद्यातील काही तरतुदींचं उल्लंघन केल्यामुळे आणि कमिशनच्या रूपाने बँक कर्मचार्‍यांना मोबदला देण्याबाबत सुचवलेल्या सूचनांसाठी दंड आकारण्यात आला आहे. 

(SBI च्या कोट्यावधी ग्राहकांसाठी खास सुविधा! गरज पडल्यास शिल्लक रकमेपेक्षा जास्त पैसे काढू शकता!)

आरबीआयने सांगितले की, ही कारवाई नियामक अनुपायाच्या अभावाशी संबंधित आहे. एसबीआयने आर्थिक स्थितीच्या संदर्भात 31 मार्च 2017 आणि 31 मार्च 2018 रोजीही माहिती दिली होती. हा जोखीम मूल्यांकन अहवालाशी (RAR) संबंधित होता. हा दंड का आकारला जाऊ नये आणि त्याच वेळी कर्मचार्‍यांना भरपाई देय देण्याचे स्पष्टीकरणही आरबीआयने दिले होते.

(SBI च्या 'या' खात्यावर करा कमाई, खाते उघडल्यानंतर होईल 1350 रुपयांचा फायदा, जाणून घ्या...)

दरम्यान, आरबीआयने बँकिंग रेग्युलेशन कलम 1949 चे कलम 10 (1) (बी) (ii) चे उल्लंघन आणि कमिशन म्हणून कर्मचार्‍यांना मोबदला न दिल्यामुळे एसबीआयवर 2 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकएसबीआयस्टेट बँक आॅफ इंडियाबँकव्यवसाय