Join us  

रिलायन्स सुरू करणार नवा रिटेल ब्रँड; 'Big Bazaar' ची जागा घेणार 'Smart Bazaar'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 3:40 PM

रिलायन्स रिटेल आता नवा स्टोअर ब्रँड सुरू करण्याच्या तयारीत आहे.

रिलायन्स रिटेल (Reliance Retail) लवकरच आपला नवा स्टोअर ब्रँड सुरू करण्याच्या तयारीत आहे. स्मार्ट बाझार (Smart Bazaar) असं त्याचं नाव असणार आहे. ज्या ठिकाणी फ्युचर ग्रुपच्या (Future Group) बिग बाझार (Big Bazaar) आऊटलेट चालवण्यात येत होते, त्या जागांसाठी हे नाव ठरवण्यात आलं आहे. दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रिजचा रिटेल विभाग ९५० ठिकाणी आपल्या स्वत:ची स्टोअर्स सुरू करण्यावर काम करण्यात असल्याची माहिती इंडस्ट्रीच्या दोन इक्झिक्युटिव्हनं दिल्याचं वृत्त इकॉनॉमिक टाईम्सनं दिलंय. ही स्टोअर्स फ्युचर ग्रुपला सब-लीजवर देण्यात आली होती, परंतु भाडं भरण्याचं कारण सांगून ताबा काढून घेण्यात आला.

रिपोर्ट्सनुसार या ठिकाणी किमान १०० स्टोअर्स उघडण्याची कंपनीची योजना आहे. यामध्ये काही स्मार्ट बाजार स्टोअर्सचा समावेश आहे. याच महिन्यात ही स्टोअर्स सुरू होणार असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र, रिलायन्स रिटेल आणि फ्युचर ग्रुपकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

आवश्यक वस्तूंवर लक्ष केंद्रीत करणाररिलायन्स रिटेच्या सध्याच्या स्मार्ट सुपरमार्केटच्या तुलनेत स्मार्ट बाझारमध्ये दररोजच्या वापरातले कपडे, सामान्य मर्चेंडाईजवर अधिक लक्ष केंद्रीत केलं जाणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. ग्राहक जोडले जावे यासाठी ते बिग बाझारच्याच धर्तीवर तयार केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पसरलेल्या जागांवर सेंट्रल सारख्या मोठ्या फ्युचर ग्रुप स्टोअर्सचा समावेश आहे. या ठिकाणी कंपनी रिलायन्स मॉल सारखे विद्यमान ब्रँड आणणार आहे. याशिवाय, फ्युचर ग्रुपने रिलायन्सला सेंट्रल फॉर्मेटचा फ्युचर ग्रुपची एक फ्रेन्चायझी म्हणून चालवण्याचा प्रस्ताव दिला आहे. रिलायन्स फ्युचर ग्रुपचे किराणा स्टोअर Easy Day आणि हेरिटेजची जागा घेण्यासाठी 7-इलेव्हन आणि रिलायन्स फ्रेश सारखे काही छोटे रिटेल ब्रँड लॉन्च करेल. तर, रिलायन्सची व्हॅल्यू फॅशन चेन असलेल्या FBB ला ट्रेंड्समध्ये बदलण्यात येणार आहे.

रिलायन्स सध्या सर्वच फिजिकल असेट्स हटवत आहे. यामध्ये एसी, स्टॉकिंग शेल्व्ह्स, लाइट्स, चिलर्स, फ्रीजर्स, बिलिंग मशीन, ट्रॉली आणि एस्कलेटर मशीन सामिल आहे. कर्जाच्या रकमेची परतफेड न केल्यानं आता हे सर्व अॅसेट्स बँकांचे झाले आहेत.

टॅग्स :रिलायन्सबिग बाजारव्यवसाय