Join us  

कुणी दिवाळखोर... तर कुणी करतोय दणक्यात कमाई, अनिल अंबानींच्या या कंपनीने ९ महिन्यांत डबल केला पैसा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 2:45 PM

Reliance Power: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी यांचे बंधू अनिल अंबानी यांचा उद्योगव्यवसाय तितकाचा व्यवस्थित चालत नाही आहे. तसेच त्यांच्या काही कंपन्या ह्या दिवाळखोरीच्या मार्गावर आहेत.

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी यांचे बंधू अनिल अंबानी यांचा उद्योगव्यवसाय तितकाचा व्यवस्थित चालत नाही आहे. तसेच त्यांच्या काही कंपन्या ह्या दिवाळखोरीच्या मार्गावर आहेत. मात्र रिलायन्स पॉवर ही त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये असलेली अशी एक कंपनी आहे जिचा व्यवसाय धडाक्यात सुरू आहे. तसेच या कंपनीत गुंतवणूक करणारे गुंतवणूकदारही भरपूर कमाई करत आहेत. केवळ ९ महिन्यांमध्ये रिलायन्स पॉवरने गुंतवणूकदारांचा पैसा डबल केला आहे, त्यावरून कंपनीच्या कमाईचा अंदाज येऊ शकतो.  

२०२३ साल अनिल अंबानी यांच्या या कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरलं आहे. त्याचं कारण म्हणजे मागच्या ९ महिन्यांमध्ये कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना दुप्पटीहून अधिक रिटर्न मिळाला आहे. २८ मार्च २०२३ रोजी रिलायन्स पॉवरच्या एका शेअरची किंमत ही ९.१५ रुपये एवढी होती. ती मागच्या शुक्रवारी १ टक्क्याहून अधिक घसरून २२.४० रुपये झाली आहे. या हिशोबाने कंपनीने या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे ६० टक्के रिटर्न दिला आहे.

रिलायन्स पॉवर शेअरचा ५२ आठवड्यांतील हाय लेव्हल २५.२० रुपये आहे. तर त्याची लो लेव्हल ९.०५ रुपये आहे. अनिल अंबानी यांच्या कंपनीच्या मार्केट कॅपिटलायझेशनचा विचार केल्यास ते ८ हजार ४० कोटी रुपये आहे. मागच्या ९ महिन्यांच्या कालावधीमध्ये कंपनीच्या शेअरच्या किमतीत झालेल्या वाढीवर नजर टाकल्यास मागच्या सहा महिन्यांमध्ये त्याने रॉकेटच्या वेगाने प्रवास केला आहे. १० जुलै २०२३ रोजी या शेअरची किंमत १५ रुपयांच्या लेव्हलवर होती. त्यानंतर ३० ऑगस्ट रोजी तो २० रुपये एवढा झाला होता. या डिसेंबर महिन्यातच कंपनीने तिची उच्च पातळी गाठली होती.  

टॅग्स :रिलायन्सअनिल अंबानीशेअर बाजार