Join us  

Reliance Jio GigaFiber साठी असे करा रजिस्ट्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 1:01 PM

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने Jio GigaFiber सेवेची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. आपल्या Jio GigaFiber लॉन्चसोबतच कंपनीने भारतीय ब्रॉडबॅंड मार्केटमध्ये एन्ट्री केलीये.

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने Jio GigaFiber सेवेची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. आपल्या Jio GigaFiber लॉन्चसोबतच कंपनीने भारतीय ब्रॉडबॅंड मार्केटमध्ये एन्ट्री केलीये. कंपनीने या सेवेसाठी गेल्या महिन्यात रजिस्ट्रेशन सुरु केले होते. 

यावेळी Jio ने काही प्रिव्ह्यू प्लॅनची घोषणाही केली होती. या ऑफरनुसार, सब्सक्रायबर्सना ९० दिवसांसाठी ३०० जीबी डेटा मिळणार आहे. या ऑफर फायदा घेण्यासाठी ग्राहकांना ४, ५०० रुपये सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून जमा करावे लागणार आहेत. हे पैसे रिफंडेबल असतील. 

डिपॉझिट जमा करण्यासाठी ग्राहक डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, जिओ मनी किंवा पेटीएमचा वापर करु शकतात. जर तुम्ही आतापर्यत Jio GigaFiber चं रजिस्ट्रेशन केलं नसेल आणि तुम्हाला करायचं असेल तर खालील पध्दतीने तुम्ही रजिस्ट्रेशन करु शकता. 

१) Jio GigaFiber च्या रजिस्ट्रेशनसाठी रिलायन्स जिओच्या वेबसाईटवर लॉगऑन करा.

२) रिलायन्स जिओच्या वेबसाईटवर  Jio GigaFiber चं बॅनर दिसेल.

३) या बॅनरमध्ये तुम्हाला एक लाल रंगाचं बटण दिसेल ज्यावर  'invite Jio GigaFiber now' लिहिलेलं असेल. 

४) या बटणावर क्लिक करा, क्लिक केल्यावर एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवर लोकेशन द्यावं लागेल. 

५) पत्ता टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराचा किंवा ऑफिसचा पत्ता द्यावा लागेल. त्यानंतर 'Proceed' वर क्लिक करा.

६) आता इथे ओटीपी जनरेट करण्यासाठी तुम्हाला तुमचं नाव, मोबाईल नंबर टाकावा लागेल. 

७)  तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफाय झाल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.  

टॅग्स :रिलायन्स जिओव्यवसायजिओ