Mukesh Ambani Deal : मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजनं (RIL) अमेरिकन हेल्थकेअर (American Healthcare) कंपनीमध्ये मोठा हिस्सा खरेदी केला आहे. रिलायन्स डिजिटल हेल्थ लिमिटेड (RDHL) आणि हेल्थ अलायन्स ग्रुप इंक यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. कंपनीनं कंपनीतील ४५ टक्के हिस्सा ८५ कोटी रुपयांना (१० दशलक्ष डॉलर) खरेदी केला आहे. हा करार २०२४ च्या अखेरीस होणार आहे. आरोग्य सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील रिलायन्सच्या विस्तार धोरणाचा हा एक भाग आहे. या माध्यमातून कंपनीला भारत आणि जगातील इतर भागांमध्ये आरोग्य सेवांपर्यंत लोकांची पोहोच वाढवायची आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी वर्षाच्या अखेरीस आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज या त्यांच्या कंपनीची उपकंपनी असलेल्या आरडीएचएलनं अमेरिकेतील हेल्थ अलायन्स ग्रुप इंकसोबत सामंजस्य करार केलाय. त्यांनी कंपनीतील ४५ टक्के हिस्सा खरेदी केलाय. हा करार सुमारे ८५ कोटी रुपयांचा आहे, जो एक कोटी डॉलरच्या बरोबरीचा आहे. हेल्थ अलायन्स ग्रुप इंक हेल्थकेअर, आयटी आणि इनोव्हेशन क्षेत्रात कार्यरत आहे.
२०२२ मध्ये स्थापना
आरडीएचएलचे मुख्यालय डेलावेअर येथे आहे. त्याची स्थापना डिसेंबर २०२२ मध्ये झाली. अमेरिका, भारत आणि जगातील इतर भागांमध्ये आरोग्यसेवेत प्रवेश सुधारण्यासाठी कंपनी तंत्रज्ञान-आधारित सोल्यूशन्स विकसित करते. या अधिग्रहणातून रिलायन्सला डिजिटल हेल्थकेअर आणि इनोव्हेशन क्षेत्रात आपलं स्थान मजबूत करायचं आहे.