Join us

रिलायन्सची हॅथवे अन् डेनशी भागीदारी, जिओच्या ग्राहकांना मिळणार जबरदस्त स्पीड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 16:12 IST

रिलायन्स उद्योग समूहाला तिमाहीत जबरदस्त फायदा झाला आहे.

नवी दिल्ली- रिलायन्स उद्योग समूहाला तिमाहीत जबरदस्त फायदा झाला आहे. विशेष म्हणजे रिलायन्सनं केबल टीव्ही आणि ब्रॉडबँड सुविधा पुरवणा-या हॅथवे केबल आणि डेन नेटवर्कचे शेअर विकत घेण्याची घोषणा केली आहे. रिलायन्स जिओ 2940 कोटी रुपयांमध्ये हॅथवेमध्ये 51.3 टक्के भागीदारी विकत घेणार आहे. तर डेन नेटवर्कमध्ये 2045 कोटी रुपयांमध्ये 66 टक्के भागीदारी विकत घेण्याची घोषणा रिलायन्सनं केली आहे. त्यामुळे रिलायन्स जिओच्या ब्रॉडबँड नेटवर्कचं कव्हरेज जलद गतीनं वाढण्यास मदत होणार आहे.हॅथवेमध्ये रहेगा ग्रुपचा वरचष्मा आहे. तर डेनमध्ये समीर मनचंदा यांची भागीदारी आहे. हॅथवे बोर्डानं रिलायन्स जिओला प्रेफ्रेंशियल इश्यू म्हणजेच शेअर खरेदी करण्याला परवानगी दिली आहे. रिलायन्स जिओला हॅथवेनं 90.8 कोटी शेअर्स 32.35 रुपयांच्या भावानं विकले आहेत. तसेच डेन नेटवर्कच्या 28.1 कोटी शेअर्सला जिओनं 72.66 रुपयांच्या किमतीनं खरेदी केलं आहे. त्यामुळे या डेन कंपनीमध्ये रिलायन्सची जवळपास 66.01 भागीदारी झाली आहे. या करारानं दोन्ही कंपन्यांना फायदा होणार आहे. या दोन कंपन्यांच्या माध्यमातून रिलायन्स जिओ लोकल नेटवर्कच्या जाळ्यात तेजीनं हातपाय पसरणार आहे. त्यामुळे ग्राहकांना स्वस्त आणि हायस्पीड इंटरनेट मिळणार आहे. 

टॅग्स :जिओ