Join us  

₹110 वरुन ₹3 वर आला हा शेअर, आता गुंतवणूकदार तुटून पडले; अनिल अंबानींची कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 5:29 PM

Reliance Home Finance share: अनिल अंबानींच्या या फायनान्स कंपनीच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे.

Reliance Home Finance share:शेअर बाजारात असे अनेक पेनी स्टॉक्स आहेत, ज्यांची मागणी अचानक वाढते. यामागे कोणतेही ठोस कारण सांगता येत नाही. असाच एक पेनी स्टॉक रिलायन्स होम फायनान्सचा आहे. अनिल अंबानींच्या या फायनान्स कंपनीच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा वादळी वाढ झाली आहे.

बुधवारी रिलायन्स होम फायनान्सच्या शेअरमध्ये 5 टक्क्यांची वाढ झाली. ट्रेडिंग दरम्यान या शेअरची किंमत 3.67 रुपयांवर पोहोचली. एक दिवस आधी, म्हणजेच मंगळवारी या शेअरची किंमत 3.50 रुपयांवर बंद झाली होती. तर, 9 जानेवारी 2024 रोजी हा शेअर 6.22 रुपयांवर होता. हा या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. तसेच, 17 ऑगस्ट 2022 रोजी शेअर 1.61 रुपयांच्या पातळीवर घसरला होता. विशेष म्हणजे, 6 वर्षांपूर्वी हा शेअर 110 रुपयांच्या पातळीवर होता.

रिलायन्स होम फायनान्समध्ये अनिल अंबानींची हिस्सेदारी रिलायन्स होम फायनान्स, ही अनिल अंबानींच्या दिवाळखोर कंपनी रिलायन्स कॅपिटलची उपकंपनी आहे. शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल बोलायचे झाल्यास, मार्च तिमाहीपर्यंत प्रवर्तकांची हिस्सेदारी 0.74 टक्के आहे. सध्या अनिल अंबानी यांच्याकडे रिलायन्स होम फायनान्सचे 2,73,891 शेअर्स आहेत. पत्नी टीनाकडे 2,63,474 शेअर्स आहेत, तर मुलगा जय अनमोल अंबानीकडे 28,487 शेअर्स आहेत. पब्लिक शेअर होल्डिंग 99.26 टक्के आहे.

व्यवस्थापनात बदलअलीकडे रिलायन्स होम फायनान्सच्या व्यवस्थापनात बदल झाला आहे. 15 एप्रिल रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत गोपाल रामरत्नम, रविशेखर पांडे आणि हीना जयसिंघानिया यांच्या स्वतंत्र संचालक म्हणून प्रवेशास मान्यता देण्यात आली. रिलायन्स होम फायनान्सच्या डिसेंबर तिमाही निकालांबद्दल बोलायचे तर, महसुलात 99.89% ची मोठी घट झाली आहे.

(टीप-शेअर बाजारातगुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :अनिल अंबानीव्यवसायगुंतवणूकशेअर बाजार