Join us  

अंबानी फॅमिली खरंच लंडनमध्ये स्थायिक होणार? कशासाठी घेतलं 592 कोटींचं 'घर'? खुद्द रिलायन्सनंच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2021 12:13 AM

रिलायन्सने लंडनमधील ही मालमत्ता 592 कोटी रुपयांना विकत घेतल्यानंतर, अंबानी कुटुंबीय स्टोक पार्क इस्टेटला आपले दुसरे घर बनवणार असल्याची चर्चा सुरू आहे. ते मुंबईत 4,00,000 वर्ग फुटांच्या घरात राहतात. त्यांचे घर 'अँटीलिया' शहरातील एल्टामाउंट रोडवर आहे.

मुंबई - मुकेश अंबानी अता मुंबई बरोबरच लंडनमध्येही राहणार असल्याच्या चर्चांना रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (RIL) शुक्रवारी पूर्ण विराम दिला. रिलायन्सने म्हटले आहे, की, अंबानी यांची लंडन अथवा जगात कुठेही स्थायिक होण्याची किंवा राहण्याची कोणतीही योजना नाही. तसेच, अंबानी कुटुंब बकिंगहॅमशायरच्या स्टोक पार्क परिसरात 300 एकरच्या कंट्री क्लबला आपले मुख्य घर बनवणार असल्याचे वृत्त "खोटे आणि निराधार अंदाज" असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.     कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे, ''रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड हे स्पष्ट करू इच्छिते की चेअरमन (अंबानी) आणि त्यांच्या कुटुंबाची लंडन किंवा जगात कोठेही स्थायिक होण्याची किंवा राहण्याची कोणतीही योजना नाही.'' रिलायन्सने लंडनमधील ही मालमत्ता 592 कोटी रुपयांना विकत घेतल्यानंतर, अंबानी कुटुंबीय स्टोक पार्क इस्टेटला आपले दुसरे घर बनवणार असल्याची चर्चा सुरू आहे. ते मुंबईत 4,00,000 वर्ग फुटांच्या घरात राहतात. त्यांचे घर 'अँटीलिया' शहरातील एल्टामाउंट रोडवर आहे.

निवेदनानुसार, ''आरआयएल समूहाची कंपनी, आरआयआयएचएलने नुकतेच स्टोक पार्क एस्टेटचे अधिग्रहण केले आहे. या 'हेरिटेज' संपत्तीच्या अधिग्रहणाचा उद्देश मार्गदर्शक तत्त्वे आणि स्थानिक नियमांचे पूर्णपणे पालन करून याला एक मुख्य गोल्फिंग आणि स्पोर्टिंग रिसॉर्टचे रूप देणे आहे." मात्र, वृत्तांमध्ये आलेल्या उल्लेखांसंदर्भात यात अंबानी यांच्या वारंवार होत असलेल्या परदेश दौऱ्यासंदर्भात भाष्य करण्यात आलेले नाही.  

टॅग्स :मुकेश अंबानीनीता अंबानीरिलायन्सइंग्लंडलंडन