Join us  

Reliance AGM 2023: "... वाटतंय की ते इथेच बसलेत," जेव्हा धीरुभाई अंबानींच्या आठवणीत भावूक झालेले मुकेश अंबानी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 1:00 PM

Reliance AGM 2023: धीरुभाई अंबानी यांनी रिलायन्सच्या एजीएमची प्रथा सुरू केली होती.

देशातील सर्वात व्हॅल्युएबल कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजची एजीएम आज होत आहे. देशात हजारो कंपन्या असल्या तरी सर्वात जास्त चर्चा आहे ती रिलायन्सच्या एजीएमची. याचं कारण म्हणजे कंपनीच्या गुंतवणूकदारांची संख्या ३६ लाखांहून अधिक आहे. या कारणास्तव, त्याची देशभरात सर्वाधिक चर्चा आहे. कंपनी सहसा यामध्ये मोठ्या घोषणा करते, त्यामुळे गुंतवणूकदारांसोबतच शेअर बाजारही त्याची आतुरतेने वाट पाहत असतो. कंपनीच्या एजीएमची सुरुवात रिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांनी केली होती. देशात इक्विटी कल्चर लोकप्रिय करण्याचं श्रेय धीरूभाई अंबानी यांना जातं.

२०१७ मध्ये रिलायन्सच्या ४० व्या एजीएमला संबोधित करताना, कंपनीचं अध्यक्ष मुकेश अंबानी त्यांचे वडील धीरूभाई अंबानी यांच्या आठवणीनं भावूक झाले होते. त्यांची आई कोकिलाबेन अंबानी यांनाही अश्रू अनावर झाले होते. "जर एखादा फोन कॉल पोस्टकार्डपेक्षा स्वस्त झाला तर तुम्ही कोट्यवधी भारतीयांच्या आयुष्यात क्रांती घडवू शकता. रिलायन्स जिओने केवळ फोन कॉल फ्री केले नाही तर हँडसेटही खूप स्वस्त केले," असं धीरुभाई अंबानी म्हणायचे.

मुकेश अंबानी भावूकमुकेश अंबानी रिलायन्सच्या एजीएमदरम्यान भावूक झाले. "असं वाटतंय की ते इथेच बसलेत. ते हसतायत, तुमच्याशी माझ्याशी बोलतायत. आता तू माझ्या जागी आहेस असं ते सांगतायत. रिलायन्सला पुढे नेण्याचं सर्व शेअरहोल्डर्स, पार्टनर्स आणि कर्मचाऱ्यांना पुढे नेण्याची जबाबदारी तुझी आहे असं ते सांगतायत," असं म्हणत त्यावेळी मुकेश अंबानी भावूक झाले होते.

रिलायन्सची एजीएम निराळीचसाधारणपणे, कंपन्यांच्या एजीएममध्ये अशा भावनिक आवाहनांना जागा नसते. पण रिलायन्सची बाब काही औरच आहे. हे एजीएमपेक्षा रॉक कॉन्सर्ट किंवा मोठ्या लग्न समारंभासारखं असते. याचे श्रेय रिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांना जाते. बाजारात दीर्घकाळ टिकायचं असेल तर भागधारकांचा विश्वासही तितकाच महत्त्वाचा आहे, हे त्यांच्या पहिल्यापासूनच लक्षात आलं. त्यांनी कधीही भागधारकांना निराश केलं नाही. १९७७ मध्ये, रिलायन्स टेक्सटाईल इंडस्ट्रीजचं सात पट सबस्काईब झाली होती.

यानंतर रिलायन्सनं दरवर्षी एजीएम आयोजित करण्यास सुरुवात केली. यामध्ये कंपनीच्या सामान्य गुंतवणूकदारांना बोलावण्यात आलं. हळूहळू धीरूभाई अंबानी गुंतवणूकदारांमध्ये एक आयकॉन बनले. ते एखाद्या रॉकस्टार प्रमाणे गुंतवणूकदारांसमोर हजर असायचे. ते असे रॉकस्टार होते ज्यांनी गाणं गायलं नाही पण डिव्हिडंटची घोषणा करायचे. ते एजीएममध्ये कंपनीच्या भविष्यातील योजना गुंतवणूकदारांसमोर ठेवत असत. १९८० च्या दशकात ते मुंबईतील कूपरेज ग्राउंडवर एजीएम आयोजित करायचे. अनेक बँकर्स आणि ब्रोकरेजना आजही ते दिवस आठवतात.

स्टेडियममध्ये एजीएममे १९८५ मध्ये त्यांनी मुंबईतील कूपरेज फुटबॉल ग्राउंड भाड्यानं घेतलं. यामध्ये रिलायन्सची एजीएम आयोजित करण्यात आली आणि १९८४ चे निकाल सादर करण्यात आले. यामध्ये सुमारे १२ हजार भागधारक सहभागी झाले होते. काही जण जमिनीवर बसले होते. देशातील कोणत्याही कंपनीच्या भागधारकांची ही सर्वात मोठी बैठक होती. यामध्ये अंबानी यांनी सांगितले की, कंपनीचा नफा ५८.६ टक्क्यांनी वाढला आहे. तसंच कंपनीच्या ६७२ कोटींहून अधिक किमतीच्या नवीन प्रकल्पांबद्दल त्यांनी माहिती दिली. याच बैठकीत रिलायन्सनं आपल्या नावातून टेक्सटाईल हे नाव हटवण्यासही मान्यता दिली.

आता काय बदललंमुकेश अंबानी यांच्या काळातही रिलायन्सच्या एजीएमची चमक कायम आहे. पण तंत्रज्ञानामुळे त्यात अनेक बदल झाले आहेत. या एजीएममध्ये Jio 5G आणि Jio Fiber सारखी उत्पादने लाँच करण्यात आली आहेत. आता एजीएम केवळ भागधारकांसाठीच नाही तर लोकांसाठीही ऑनलाइन प्रसारित केली जाते. कदाचित यामुळेच रिलायन्सची एजीएम इतर कंपन्यांपेक्षा वेगळी ठरते.

टॅग्स :रिलायन्समुकेश अंबानीधीरुभाई अंबानी