Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेखा झुनझुनवालांना एका झटक्यात ८५८ कोटींचा लॉटरी; एलआयसीही मालामाल, 'ही' डील ठरली गेमचेंजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 11:09 IST

Rekha Jhunjhunwala : रेखा झुनझुनवाला आणि एलआयसी यांचे टायटनमध्ये लक्षणीय शेअरहोल्डिंग आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याचा फायदा गुंतवणूकदारांना झाला आहे.

Rekha Jhunjhunwala : भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या ऐतिहासिक व्यापार करारानंतर भारतीय शेअर बाजारात तेजीचे वारे वाहत आहेत. या कराराचा सर्वात मोठा फायदा टाटा समूहाची ज्वेलरी कंपनी 'टायटन कंपनी लिमिटेड'ला झाला आहे. अमेरिकेने भारतीय दागिन्यांवरील आयात शुल्कात कपात केल्यामुळे टायटनच्या शेअरने मोठी झेप घेतली असून, दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला आणि सरकारी विमा कंपनी एलआयसी यांच्या संपत्तीत काही तासांतच कोट्यवधींची भर पडली आहे.

शेअरमध्ये ४.६ टक्क्यांची धमाकेदार तेजीनॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर टायटनचा शेअर अवघ्या दोन सत्रांत ३,९५३.२० रुपयांवरून ४,१३५.१० रुपयांवर पोहोचला. म्हणजेच प्रति शेअर १८१.९० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील टॅरिफ २५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत खाली आणल्यामुळे दागिन्यांची निर्यात स्वस्त होणार आहे, ज्याचा थेट फायदा टायटनला मिळणार आहे.

रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत ८५८ कोटी रुपयांची भरदिग्गज दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे ४,७१,८४,४७० शेअर्स (५.३१% हिस्सा) आहेत. १८१.९० रुपयांच्या वाढीनुसार, त्यांच्या एकूण होल्डिंगचे मूल्य अवघ्या दोन दिवसांत ८५८.२८ कोटी रुपयांनी वाढले आहे.

एलआयसीचा खिसाही गरमकेवळ वैयक्तिक गुंतवणूकदारच नव्हे, तर सरकारी संस्था एलआयसीलाही या तेजीचा मोठा लाभ झाला आहे. एलआयसीकडे टायटनचे २,२३,२४,३०१ शेअर्स आहेत. शेअरच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे एलआयसीच्या गुंतवणुकीचे मूल्य सुमारे ४०६ कोटी रुपयांनी वधारले आहे.

निर्यातक्षम कंपन्यांसाठी सुवर्णकाळ?बाजार तज्ज्ञांच्या मते, हा करार केवळ ज्वेलरी सेक्टरपुरता मर्यादित नाही. टायटनसोबतच कल्याण ज्वेलर्स आणि सेनको गोल्ड यांसारख्या कंपन्यांनाही याचा लाभ मिळेल. त्याशिवाय कापड उद्योगाला अमेरिकन बाजारपेठेत मोठी संधी मिळेल. निर्यातक्षम रासायनिक कंपन्यांच्या नफ्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

वाचा - ओला-उबरला जोरदार टक्कर! आता स्वस्त दरात करा प्रवास; ‘भारत टॅक्सी अ‍ॅप’चे आज होणार लाँचिंग

रेखा झुनझुनवाला यांची टायटनमधील दीर्घकालीन गुंतवणूक पुन्हा एकदा यशस्वी ठरली आहे. धोरणात्मक बदलांमुळे एखाद्या विशिष्ट क्षेत्राला कशी गती मिळते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Rekha Jhunjhunwala gains ₹858 crore as Titan shares surge post-US deal.

Web Summary : US-India trade deal boosts Titan shares, benefiting Rekha Jhunjhunwala and LIC immensely. Jhunjhunwala's holding increased by ₹858 crore, while LIC gained ₹406 crore. Jewellery and textile sectors are poised for growth.
टॅग्स :रेखा झुनझुनवालाएलआयसीस्टॉक मार्केटटॅरिफ युद्ध