Join us  

कमी झालेली किंमत घर खरेदीच्या पथ्यावर, दोन दशकांतील सर्वात स्वस्त गृह कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 6:18 AM

कोरोना संक्रमण रोखण्यासाठी लागू झालेले लॉकडाऊन आणि आर्थिक अरिष्टाचा विपरीत परिणाम घरांच्या खरेदी विक्रीवर झाला आहे. पण घरांच्या खरेदी विक्री व्यवहारांसाठी आकारले जाणारे मुद्रांक शुल्क कमी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय विकासक आणि ग्राहक दोघांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

मुंबई : घरांच्या किंमती आवाक्याबाहेर गेल्यामुळे अनेकांना इच्छा असूनही घर खरेदीचे स्वप्न पूर्ण करणे शक्य होत नव्हते. मात्र, राज्य सरकारने दिलेली मुद्रांक शुल्कातील सवलत, गेल्या दोन दशकांमध्ये सर्वात कमी व्याज दराने उपलब्ध होणारे गृह कर्ज, आर्थिक मंदीतून सावरण्यासाठी विकासकांनी घरांच्या थोड्याफार प्रमाणात कमी केलेल्या किंमती आदी कारणांमुळे घर खरेदीची सर्वोत्तम संधी उपलब्ध झाल्याचे या क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे.कोरोना संक्रमण रोखण्यासाठी लागू झालेले लॉकडाऊन आणि आर्थिक अरिष्टाचा विपरीत परिणाम घरांच्या खरेदी विक्रीवर झाला आहे. पण घरांच्या खरेदी विक्री व्यवहारांसाठी आकारले जाणारे मुद्रांक शुल्क कमी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय विकासक आणि ग्राहक दोघांसाठी उपयुक्त ठरणार आहे. ज्या इमारतींचे बांधकाम पूर्ण होऊन ओसी (वापर परवाना) मिळाली आहे, तिथल्या घर खरेदीसाठी जीएसटी भरावा लागत नाही. त्यामुळे रेडी टू मुव्ह गटातली घरे खरेदी प्राधान्याने खरेदी केली जातील असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्याशिवाय पुर्णत्वाच्या मार्गावर असलेल्या घरांनासुध्दा चांगली मागणी असेल असा अ‍ॅनरॉक या मालमत्ता क्षेत्रातील रिसर्च टीमचा अंदाज आहे.डिसेंबर अखेरीपर्यंत या घरांचे व्यवहार केल्यास मुद्रांक शुल्कात तीन टक्के तर डिसेंबर ते मार्च महिन्यापर्यंत गृह खरेदी केल्यास दोन टक्के सवलत मिळणार आहे. राज्य सरकारचा महसूल त्यातून मोठ्या प्रमाणात बुडणार आहे. मात्र, बांधकाम व्यवसायावर इतर २६९ पूरक व्यवसाय अवलंबून आहेत. त्यांचे अर्थचक्र सुरू ठेवायचे असेल तर घरांचे खरेदी विक्री व्यवहार वाढविण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सरकारने हा सवलतीचा निर्णय घेतला आहे. ही सवलत सहा महिन्यांसाठीच असल्याने या कालावधीत सर्वाधिक व्यवहार होतील असा ठाम विश्वास विकासकांकडून व्यक्त केला जात आहे.गृह खरेदीला उच्चांकीभरारी मिळेलनोटबंदी आणिरेरामुळे बांधकाम व्यवसायावर विपरीत परिणाम झाला होता. परंतु, आता घरांच्या खरेदी विक्री व्यवहारांवरीलमुद्रांक शुल्क कमी करण्याच्या निर्णयामुळे गृह खरेदीला पुढील सहा महिन्यांत उच्चांकी उभारी मिळेल.- विजय पवार, सीएमडी, मीराडोरमध्यमवर्गीयांचे स्वप्न साकार होईलआरबीआयने गृह कर्जाच्या व्याजदरात कपात केल्यानंतरही अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, आता मुद्रांक शुल्कातही सवलत मिळू लागल्याने मध्यमवर्गीयांना आपले स्वप्न साकार करणे सुकर होईल.- मुस्ताक शेख, सीएमडी, समरीन ग्रुपअर्थव्यवस्थेला संजीवनीअर्थव्यवस्थेला संजीवनी देण्यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरेल. ज्यांना घरांची निकड आहे आणि काही महिन्यांपासून ते घरांच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आहे. तसेच परवडणारी घरे पूर्वीपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध होणार आहेत.- दिपक गरोडीया, उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, दोस्ती रिअ‍ॅलिटीविकासकआणि ग्राहक दोघांची फायदामुद्रांक शुल्क कमी झाल्याने घरांच्या किंमती कमी झाल्याने गृह खरेदीदारांना फायदा होईल. तर, घरांची मागणी वाढल्यामुळे विकासकांची आर्थिक कोंडी दूर होईल. त्यामुळे या निर्णयाचे आम्ही मनापासून स्वागत करतो.- गिरीश देढिया, निसर्ग निर्माण डेव्हलपर्स, पार्टनरमागणी वाढेलमुद्रांक शुल्कातील सवलतीमुळे मुंबई महानगर क्षेत्रातील बांधकाम व्यवसायाचे पुनरुज्जीवन होईल. येत्या उत्सवांच्या काळात घरांची मागणी वाढेल. कोरोना काळातील घटलेली घरांची मागणी आणि आर्थिक कोंडीमुळे अस्वस्थ झालेल्या विकासकांना त्यामुळे दिलासा मिळेल.- नयन शहा, अध्यक्ष, क्रेडाई, एमसीएचआय

टॅग्स :घरमुंबई