Join us

यूपीआय व्यवहारामध्ये विक्रमी वाढ; ॲानलाइन खरेदीला पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 06:07 IST

गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात व्यवहार थंडावले होते. मात्र, सध्या अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असून, कमी झालेले कोरोना निर्बंध व सणासुदीचा काळ असल्याने नागरिकांनी विक्रमी खरेदी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : युनिफाइड पेमेंट इंटरफेस अर्थात ‘यूपीआय’चा देशात विक्रमी वापर वाढला असून, डिसेंबर २०२१ मध्ये तब्बल ४५६ कोटी रुपयांचे व्यवहार झाले. या व्यवहारांचे एकूण मूल्य ८.२७ लाख कोटी रुपये होते. ऑक्टोबरमध्ये ४२१ कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते. चालू वर्षामध्येही यूपीआय व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज बँक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात व्यवहार थंडावले होते. मात्र, सध्या अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असून, कमी झालेले कोरोना निर्बंध व सणासुदीचा काळ असल्याने नागरिकांनी विक्रमी खरेदी केली. यामुळे मोठ्या प्रमाणात यूपीआय व्यवहारांमध्ये वाढ झाल्याचे बँक तज्ज्ञांनी म्हटले आहे.

ऑक्टोबरमध्ये महिन्यात ई कॉमर्स कंपन्यांच्या ऑनलाईन विक्रीमुळे कोट्यवधी रुपयांचे यूपीआय व्यवहार झाले. सप्टेंबरमध्ये यूपीआयद्वारे ३.०९ कोटी व्यवहार झाले होते. डिसेंबर २०२० च्या तुलनेत डिसेंबर २०२१ मध्ये यूपीआय व्यवहारांमध्ये ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२१ मध्ये ३८०० कोटींचे यूपीआय व्यवहार झाले असून, त्याचे एकूण मूल्य तब्बल ७३ लाख कोटी रुपये आहे. २०२० मध्ये २२०० कोटी रुपयांचे यूपीआय व्यवहार झाले होते.

कार्डच्या तुलनेत अधिक व्यवहारनोटाबंदीनंतर रोख रकमेची चणचण निर्माण झाल्यानंतर ऑनलाईन व्यवहारांवर भर देण्यात आला. डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या तुलनेत यूपीआय व्यवहार सध्या ८ पट अधिक होत आहेत.

३१ डिसेंबरला जेवण बाहेरून मागविण्याचा विक्रमnयूपीआयअंतर्गत खाते ते खाते पैसे पाठविण्याची सोय आहे. येत्या काळात या व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. nत्यामुळे बँकांना कोअर बँकिंग प्रणालीमध्ये बदल करावे लागणार आहेत. ३१ डिसेंबर रोजी कोरोनामुळे बाहेर फिरण्यास निर्बंध घातल्याने नागरिकांनी घरामध्ये राहूनच सरत्या वर्षाला निरोप दिला.nयावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बाहेरून जेवण मागविल्याने यूपीआयवर विक्रमी व्यवहार झाले.