Join us

मंदीची शक्यता २० टक्के वाढली, अमेरिकेतील बाजारात चिंतेची लाट, जेपी मॉर्गनचे अर्थतज्ज्ञ ब्रूस कासमन यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 10:00 IST

Recession News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफनंतर वॉल स्ट्रीटमध्ये आर्थिक चिंतेची लाट उसळली आहे. आघाडीच्या बँकांनी संभाव्य मंदीबाबत इशारा दिला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, जे मॉर्गनचे मुख्य अर्थतज्ज्ञ ब्रूस कासमन आता २०२५ मध्ये जागतिक मंदीची शक्यता ६०% इतकी असल्याचे स्पष्ट केले आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफनंतर वॉल स्ट्रीटमध्ये आर्थिक चिंतेची लाट उसळली आहे. आघाडीच्या बँकांनी संभाव्य मंदीबाबत इशारा दिला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, जे मॉर्गनचे मुख्य अर्थतज्ज्ञ ब्रूस कासमन आता २०२५ मध्ये जागतिक मंदीची शक्यता ६०% इतकी असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते ही शक्यता आधी ४०% इतकी होती. कासमन यांनी म्हटले आहे की, या करवाढीमुळे वाईट परिणाम होऊ शकतात. अमेरिकन व्यवसायिकांमध्ये अविश्वास निर्माण होऊ शकतो. पुरवठा साखळीतही अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात.

अमेरिकेतील व्हाइट हाऊसने याआधी असा अंदाज वर्तवला आहे की, या टॅरिफमुळे सरकारला दरवर्षी ६०० अब्ज डॉलर्सचा महसूल मिळेल. मात्र, अनेक अर्थतज्ज्ञांनी याबाबत शंका व्यक्त केली आहे. (वृत्तसंस्था)

इतर देशांचे कर १५ टक्के वाढणार, गोल्डमन सॅक्स- गोल्डमन सॅक्सने १२ महिन्यांत मंदीची शक्यता २०% वरून ३५% पर्यंत वाढवली आहे. कंपनीने जीडीपी वाढीचा अंदाज फक्त १% पर्यंत खाली आणला आणि बेरोजगारीचा दर ४.५% पर्यंत वाढू शकतो, असे भाकीत केले. - गोल्डमन सॅक्सने आधीच अंदाज वर्तवला आहे की, सर्व अमेरिकी व्यापार भागीदारांचे प्रत्युत्तरात्मक टॅरिफ सरासरी १५% पर्यंत वाढू शकते. ग्राहक व उद्योगांमध्ये निराशा वाढल्याचे अहवालात म्हटले आहे.  

महागाई नियंत्रणासाठी फेड व्याज कमी करणार?संपूर्ण जगाचे लक्ष आता व्हाइट हाऊस आणि फेडरल रिझर्व्ह बँकेवर आहे. या स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नेमकी कोणती पावले उचलली जाणार याकडे जगाचे लक्ष आहे. अस्थिर स्थितीमुळे नागरिक चिंतेत आहेत.  

फेडरल रिझर्व्ह बँकेवरही आर्थिक दबाव वाढला आहे. आता या टॅरिफच्या परिणामांना सौम्य करण्यासाठी फेड २०२५ मध्ये तीन वेळा व्याजदर कपात करू शकते. फेडरल रिझर्व्ह बँकेवरही आर्थिक दबाव वाढला आहे. 

सरकारी खर्चात कपातीमुळे परिस्थिती आणखी बिकटमूडीज ॲनालिटिक्सचे मुख्य अर्थतज्ज्ञ मार्क झांडी यांनी मंदीचा अंदाज १५% वरून ४०% पर्यंत वाढवला आहे. व्यापार युद्ध तीव्र होत आहे आणि सरकारी खर्चात कपात होत आहे, त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, अशी पोस्ट त्यांनी एक्सवर केली आहे.

 

टॅग्स :अर्थव्यवस्थाशेअर बाजारआंतरराष्ट्रीय