Join us  

महागाईवर रिझर्व्ह बँक अधिक कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत, आणखी वाढू शकतात व्याजदर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 2:33 PM

RBI येणाऱ्या दिवसांमध्ये पुन्हा एकदा व्याजदर वाढवू शकते. रिझर्व्ह बँकेसाठी महागाई एक धोका बनून समोर आली आहे.

येणाऱ्या काही दिवसांमध्ये रिझर्व्ह बँक व्याजदरात पुन्हा एकदा वाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रिझर्व्ह बँकेसमोर महागाई एक धोका बनून उभी ठाकली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी रिझर्व्ह बँक पुढील सहा ते आठ महिने अशी पावले उचलू शकते. महागाईचा सामना करण्यासाठी आपल्या व्याजदरात वाढ करण्याची घोषणा रिझर्व्ह बँक करू शकते अशी माहिती सीएनबीसी आवाजनं सूत्रांच्या हवाल्यानं दिली आहे.PNB ग्राहकांना मोठा झटका! गृहकर्जासह इतर कर्जाचे व्याजदर वाढले, तपासा नवीन दर रिझर्व्ह बँक जून महिन्यात महागाई दराच्या अंदाजातही वाढ करू करतं. वाढत्या किंमती अर्थव्यवस्थेतील मागणी करू शकतात. यानंतरही रिझर्व्ह बँक ही जोखीम पत्करण्यास तयार आहे, कारण त्यांच्यासमोर महागाई यावेळी सर्वात मोठा धोका आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी रिझर्व्ह बँक प्राधान्यानं पावलं उचलेल आणि येत्या सहा ते आछ महिन्यांपर्यंत महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी व्याजदरात वाढ होताना दिसून येईल.

महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी व्याजदर वाढवा! माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा सल्लायापूर्वी रघुराम राजन यांनीही दिला होता सल्लामहागाई नियंत्रणात आणण्यासाठी एका टप्प्यावर रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक व्याजदरांत वाढ करायला हवी, असं प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी यापूर्वी केलं होतं. महागाई विरोधातील लढाई कधीही संपत नसते, ही बाब लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. भारतात महागाई वाढलेली आहे. जगातील इतर देश ज्याप्रमाणे धोरणात्मक व्याजदरात वाढ करीत आहेत, तशीच व्याजदर वाढ भारतीय रिझर्व्ह बँकेनेही करायला हवी. रिझर्व्ह बँकेने मागील तीन वर्षांपासून धोरणात्मक व्याजदरांत वाढ केलेली नाही. सध्याच्या परिस्थितीत राजकीय नेते आणि नोकरशहा यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, व्याजदरांत वाढ करणे हे काही विदेशी गुंतवणूकदारांना फायदा देणारे देशविरोधी कृत्य नाही. ही आर्थिक स्थैर्यात केलेली गुंतवणूक असून भारतीय नागरिकांच्या ती हिताची आहे, असंही ते म्हणाले होते.

टॅग्स :शक्तिकांत दासभारतीय रिझर्व्ह बँकमहागाई