Join us

गुड न्यूज! RBI देणार १० हजार कोटी; PMC ग्राहकांना मुदत ठेवींची रक्कम नोव्हेंबरपर्यंत मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 07:54 IST

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंकेच्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंक आणि गुरु राघवेंद्र सहकारी बॅंकेच्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. या बॅंकांमध्ये अडकलेले पैसे नाेव्हेंबरपर्यंत ग्राहकांना परत मिळणार आहे. डिपाॅझिट विमा याेजनेंतर्गत हा दिलासा मिळणार आहे. त्यासाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया १० हजार काेटी रुपये देणार आहे. 

डिपाॅझिट विमा याेजनेमध्ये नुकताच बदल करण्यात आला हाेता. त्यानुसार ९० दिवसांमध्ये पैसे परत मिळण्याची हमी देण्यात आली हाेती.  त्यानुसार पीएमसी बॅंक आणि गुरु राघवेंद्र बॅंकेच्या ग्राहकांना पैसे परत मिळणार आहेत. बॅंकांकडून ग्राहकांची यादी तयार करण्यात येत आहे. काेणकाेणते ग्राहक या याेजनेद्वारे पैसे परत मिळण्यासाठी पात्र आहेत, त्याची यादी करण्याची आरबीआयला देण्यात येईल. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार आरबीआयला यासाठी १० हजार काेटी रुपये खर्च करावे लागणार आहेत.

मुद्दल व व्याजासह किती पैसे मिळतील?

ग्राहकांना पाच लाख रुपयांपर्यंतचीच रक्कम परत मिळेल. त्यात मुद्दल आणि व्याजाचा समावेश राहील. ग्राहकांची ठेव त्यापेक्षा कितीही जास्त असेल, तरीही पाच लाख रुपयेच मिळतील. विमा याेजना भारतात सुरू असलेल्या प्रत्येक बॅंकेसाठी लागू आहे. 

टॅग्स :पीएमसी बँकभारतीय रिझर्व्ह बँक