Join us  

काय सांगता, आता 100 रुपयांच्या नोटेचं आयुष्य आणखी वाढणार; जाणून घ्या कसं!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 12:09 PM

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर काही नोटांना कोटिंग करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता लवकरच चलनात 100 रुपयांची नवीन आणि खास नोट जारी करणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या वार्षिक अहवालात 100 रुपयांच्या नोटांना वार्निशचा कोट देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे सध्या चलनात असणाऱ्या जांभळ्या रंगाच्या 100 रुपयांच्या नोटा आता आणखीच लखलखणार आहेत.  तसेच या नोटांचे आयुष्यही वाढणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर काही नोटांना कोटिंग करण्यात येणार आहे. खासकरुन वार्निश कोटिंग केल्यामुळे  नोटांचे आयुष्य वाढते. म्हणजेच, या नोटा लवकर फाटणार नाहीत. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी झाल्यास सर्व नोटांना वॉर्निश कोट लावण्यात येणार आहे. जगभरातील अनेक देशांत वार्निश नोटा वापरल्या जातात. त्यामुळे हा अनुभव पाहता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशात वार्निश नोटा आणण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या याची सुरुवात 100 रुपयांच्या नोटांपासून होणार आहे. 

सध्या चलनात असलेल्या नोटा लवकर मळकट होतात किंवा फाटतात. दरवर्षी अशा करोडो रुपयांच्या फाटलेल्या किंवा मळकट नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला रिप्लेस कराव्या लागतात. सर्वसाधारण प्रत्येक पाचपैकी एक नोट दरवर्षी बाद करावी लागते. यासाठी जास्त निधी खर्च होतो. या समस्येचा सामना करण्यासाठी काही देश प्लॉस्टिकच्या नोटांचा वापर करतात. 

(धक्कादायक! वर्षभरात बँकांमधील घोटाळे 15 टक्क्यांनी वाढले)

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकभारत