नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI निमयांचे पालन न करणाऱ्या वित्तीय संस्था आणि बँकांवर बेधडकपणे कारवाई करताना पाहायला मिळत आहे. अनेक बँकांना नियमभंग किंवा नियमांचे योग्य पालन न केल्याप्रकरणी कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. यात आता Mastercard वर मोठी कारवाई करत रिझर्व्ह बँकेने मास्टरकार्ड एशिया/पॅसिफिक पीटीईवर बंदी आणली आहे. (rbi bars mastercard from onboarding new domestic customers from July 22)
Paytm च्या IPO ला समभागधारकांची मान्यता; १६,६०० कोटी रुपये उभारणार!
पुरेशी मुदत देऊनही संस्थांना पेमेंट सिस्टम डेटा संग्रहित करण्याच्या सूचनांचे पालन न केल्याने मास्टरकार्ड एशिया/पॅसिफिक पीटीईवर बंदी आणली असून, २२ जुलै २०२१ पासून त्याच्या कार्ड नेटवर्कवर नवीन स्थानिक ग्राहक (डेबिट, क्रेडिट किंवा प्रीपेड) जोडू शकणार नाहीत, असे आरबीआयकडून सांगण्यात आले आहे.
मास्टरकार्डच्या विद्यमान ग्राहकांवर काय परिणाम होणार?
या आदेशाचा मास्टरकार्डच्या विद्यमान ग्राहकांवर परिणाम होणार नाही. मास्टरकार्ड सर्व कार्ड जारी करणार्या बँकांना आणि बिगर बॅंकांना या सूचनांचे अनुसरण करण्यास सल्ला देईल. पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम अॅक्टच्या कलम १७ अंतर्गत असलेल्या अधिकारांचा उपयोग करून ही कारवाई करण्यात आली आहे, असे रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले आहे.
“पुढील दोन दशकांत भारतीय अर्थव्यवस्था १५ ट्रिलियन डॉलरवर जाईल”: गौतम अदानी
दरम्यान, यापूर्वी बिगर-बँकिंग वित्त संस्थांना कर्ज देणे आणि मोठ्या कर्जांचा डाटा ठेवणे यासंबंधी घालून देण्यात आलेल्या नियमांचा भंग केल्यामुळे १४ बँकांना रिझर्व्ह बँकेने मोठ्या रकमेचा दंड ठोठावला आहे. यामध्ये बंधन बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्रेडिट सुसी, इंडियन बँक, इंडसइंड बँक, कर्नाटक बँक, करुर वैश्य बँक, पंजाब ॲण्ड सिंध बँक, साऊथ इंडिया बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, जम्मू व काश्मीर बँक, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक यांचा समावेश आहे. एका उद्योग समूहाला देण्यात आलेल्या कर्जाच्या खात्याची छाननी केल्यानंतर काही त्रुटी आढळून आल्या होत्या. यावरून ही कारवाई करण्यात आली.