Join us
Daily Top 2Weekly Top 5

नियम मोडणाऱ्या बँकांवर RBI ची कारवाई! लाखोंचा दंड, जाणून घ्या ग्राहकांवर काय परिणाम होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 13:13 IST

रिझर्व्ह बँकेने पाच सहकारी बँकेविरोधात कारवाई केली आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमांचे पालन न केल्याच्या कारणामुळे काही बँकांवर कारवाई केली आहे. ही कारवाई सहकारी बँकांवर केली आहे.  यात मनमंदिर को-ऑपरेटिव्ह बँक, पुण्याची सन्मित्र को-ऑपरेटिव्ह बँक, लखवार नागरीक सहकारी बँक ऑफ गुजरात मेहसाणा, कोंटाई को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ पश्चिम बंगाल आणि सर्वोदय सहकारी बँक यांचा समावेश आहे. 

बँकांमध्ये जमा ४२,२७० कोटी रुपयांना कुणीही वाली नाही; या पैशांचे पुढे काय होतं?

रिझर्व्ह बँकेने मनमंदिर सहकारी बँकेला तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. केवायसीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि ग्राहकांच्या जमा खात्यांची पुरेशी माहिती न ठेवल्याने बँकेवर ही कारवाई करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना KYC अपडेट करणे बंधनकारक केले आहे, अशा स्थितीत नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या बँकांवर RBI दंड आकारते. कर्ज आणि अॅडव्हान्सबाबत योग्य माहिती न दिल्याबद्दल आरबीआयने मेहसाणा, गुजरातच्या लखवार नागरीक सहकारी बँकेला २ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

केवायसी नियमांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल कोंटाई को-ऑपरेटिव्ह बँकेला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. सर्वोदय सहकारी बँकेला किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल तसेच बँक ठेव खात्याची योग्य माहिती न दिल्याबद्दल ग्राहकांकडून मनमानी पद्धतीने दंड वसूल केल्याबद्दल १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ठेवी खात्यांची माहिती रोखल्याप्रकरणी पुण्यातील सन्मित्र सहकारी बँकेला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

विविध बँकांवर केलेल्या कारवाईची माहिती देताना भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकांच्या कामकाजात हस्तक्षेप करणे हा त्यांचा उद्देश अजिबात नसल्याचे म्हटले आहे. नियमांकडे दुर्लक्ष केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. यासोबतच आरबीआयने माहिती दिली की याचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही आणि या सर्व बँका नेहमीप्रमाणे काम करत राहतील.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकबँक