Join us  

TATA MOTORS ला ५ हजार कोटींचं तोटा, शेअर्स घसरले; विकत घ्यावे का?, पाहा काय म्हणतात तज्ज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 1:14 PM

TATA MOTORS चा तोटा वाढल्यानं आज शेअर बाजाराच्या कामकाजाच्या सुरूवातीच्या सत्रात शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

टाटा समुहाची कंपनी TATA MOTORS या तिमाहीमध्ये मोठा तोटा सोसावा लागला आहे. आर्थिक वर्ष २०२३ च्या पहिल्या तिमाहीत कंपनीचं नुकसान ४३२३ रूपयांवरून वाढून ५००६ कोटी रूपये झालं. जॅग्वार लँड रोवरला झालेल्या नुकसानीनं कंपनीच्या समस्या वाढवल्या आहेत. यासोबतच कंपनीचं EBIT Margin निगेटिव्ह झालं आहे.

काय म्हणतात तज्ज?जेफरिजनं टाटा मोटर्समध्ये गुंतवणूकीचा सल्ला देत खरेदी करण्याचं रेटिंग दिलं आहे. त्यांनी यासाठी प्रति शेअर ५४० रूपयांचं टार्गेट प्राईज ठरवलं आहे. कंपनीचं Q1 EBITDA वार्षिक आधारावर ४० टक्के कमी झाला आहे जो अंदाजापेक्षा कमी आहे. जेएलआरच्या कमकुवत परिणामांमुळे असं झालं आहे. दुसऱ्या तिमाहित त्यांनी जेएलआरची कामगिरी सुधारण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Nomura ने टाटा मोटर्सवर गुंतवणूकीचा सल्ला देत खरेदीचं रेटिंग दिलं आहे. तसंच या स्टॉकचं टार्गेट प्राईज त्यांनी ५२० रूपयांवर ठेवले आहे. कंपनीचे पहिल्या तिमाहीचे निर्णय कमकुवत राहिले आहेत. तर चिप्स सप्लाय सुधारल्यानं जेएलआरला फायदा होणार असल्याचंही मत त्यांनी व्यक्त केलं.

CLSA नं देखील टाटा मोटर्सवर गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. तसंच आऊटपरफॉर्मिंग रेटिंग दिलं आहे. दरम्यान, त्यांनी या शेअरचं टार्गेच प्राईज ४५३ ते ४९४ रुपयांच्या दरम्यान व्यक्त केलं आहे. जेएलआरच्या कमकुवत परिणामांचा फटका यावेळी बसल्याचंही त्यांनी सांगितलं.

(टीप - कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)

टॅग्स :टाटाजॅग्वाररतन टाटाव्यवसाय