Join us  

समाजसेवेतील अमूल्य योगदानासाठी रतन टाटांचा पी.व्ही नरसिंह राव पुरस्कारानं सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 10:15 AM

१५ मार्च रोजी मुंबईत झालेल्या समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

टाटा सन्सचे (Tata Sons) माजी अध्यक्ष रतन टाटा यांना सामाजिक सेवेतील योगदानाबद्दल प्रतिष्ठित पी.व्ही. नरसिंह राव स्मृती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. १५ मार्च रोजी मुंबईत झालेल्या समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रतन टाटा हे व्यवसाय जगतातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व असून समाजसेवेच्या क्षेत्रातील योगदानासाठीही ते ओळखले जातात. समाजसेवेच्या क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा देशातील अनेकांवर सकारात्मक परिणाम झाला आहे. 

माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांच्या नावानं दिला जाणारा हा पुरस्कार, त्या लोकांना दिला जातो त्यांनी समाज कल्याण आणि मानवतेशी संबंधित कामांसाठी आयुष्य झोकून दिलं आहे. रतन टाटा यांचे परोपकारी उपक्रम हे आरोग्यसेवा, शिक्षण, ग्रामीण विकास, पर्यावरण इत्यादी अनेक क्षेत्रांशी संबंधित आहेत. त्यांच्या उपक्रमांमुळे त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप प्रशंसा आणि सन्मानदेखील मिळालाय. 

 

८६ वर्षीय रतन टाटा यांना देशाचे दोन सर्वोच्च नागरी सन्मान - पद्मविभूषण (२००८) आणि पद्मभूषणनं (२०००) देखील सन्मानित करण्यात आलंय. हे दोन्ही सन्मान त्यांना राष्ट्र उभारणीतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल देण्यात आले आहेत. रतन टाटा यांचं यश आणि त्यांच्या कामगिरीला कोणत्याही परिचयाची गरज नाही. उल्लेखनीय म्हणजे माजी पंतप्रधान नरसिंह राव यांना यावर्षीचा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला.

टॅग्स :रतन टाटा