Join us  

रजनीकांतची फसवणूक, फ्लिपकार्टमधून मागवला 'आयफोन' अन् मिळाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 12:36 PM

रजनीकांत यांना मोबाईल मिळाला, तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं

बंगळुरू ऑनलाईन शॉपिंगची क्रेझ दिवसेंदिवस वाढत असून ग्रामीण भागातही फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉन शॉपिंगला पसंदी दिली जात आहे. मात्र, ऑनलाईन शॉपिंग केल्यानंतर फसवणूक झाल्याच्या अनेक घटना आपण यापूर्वीही ऐकल्या किंवा वाचल्या आहेत. मोबाईल मागवला अन् साबूण मिळाला, असेही अनेकदा घडले आहे. याप्रकरणातील आणखी एक फसवणुकीची घटना समोर आली आहे. ऑनलाईन शॉपिंगद्वारे अॅपल फोन मागवणाऱ्या ग्राहकाची फसवणूक झाली आहे. 

बंगळुरूतील एका सॉप्टवेअर इंजिनिअर ग्राहकाने 11 प्रो (Apple iPhone 11 Pro) ऑनलाईन शॉपिंगद्वारे मागविला होता. या मोबाईलची किंमत 93,900 रुपये आहे. त्यामुळे, इंजिनिअर रजनीकांत कुशवाह यांनी कंपनीला ऑनलाईन पेमेंटही दिले. मात्र, जेव्हा रजनीकांत यांना मोबाईल मिळाला, तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. रजनीकांत यांना अ‍ॅपलचा मोबाईल मिळाला, पण त्या मोबाईलचा कॅमेरा अन् स्क्रीन नकली असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. विशेष म्हणजे या मोबाईलचं सॉफ्टवेअरही iOS नव्हते. कंपनीकडून देण्यात आलेल्या आयफोनला पाहिल्यानंतर लगेच लक्षात येते की हा फोन ओरिजनल नाही, असे रजनीकांतने म्हटले आहे. विशेष म्हणजे रजनीकांत हे स्वत: सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत, त्यामुळे ही बाब लगेचच त्यांच्या लक्षात आली. मात्र, इतर ग्राहकांचीही अशीच फसवणूक होत असेल, याबाबत नक्कीच चिंता व्यक्त होत आहे. या घटनेनंतर रजनीकांतने फ्लिपकार्ट कंपनीला संपर्क करुन आपली फसवणूक झाल्याचं सांगितलं. कंपनीने त्यांस फोनची रिप्लेसमेंट करण्याचं आश्वासन दिलंय. मात्र, अद्यापही त्यांना ओरिजनल फोन मिळालेला नाही. 

टॅग्स :अ‍ॅपल आयओएस ११फ्लिपकार्टऑनलाइन