Join us  

रेल्वेत 25 टक्के अधिकाऱ्यांची कपात, बोर्ड ऑफ मेंबर्समधील अधिकाऱ्यांची बदली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 7:22 PM

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या लवकरच अधिकाऱ्यांची कपातीची प्रकिया सुरू होणार आहे

रेल्वे विभागाकडून लवकरच आपल्या बोर्ड ऑफ मेंबर्सची संख्या कमी करण्यात येणार आहे. त्यानुसार 25 टक्के अधिकाऱ्यांची कपात होणार असल्याची माहिती रेल्वेतील सुत्रांनी दिली. रेल्वेच्या या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास तेथील अधिकाऱ्यांची संख्या 200 वरुन थेट 150 वर येऊन पोहोचणार आहे. त्यानंतर, संचालक किंवा अधिकारी उच्च पदावर असेल, त्यांची बदली झोनमध्ये करण्यात येणार आहे. 

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या लवकरच अधिकाऱ्यांच्या कपातीची प्रकिया सुरू होणार आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या 100 दिवसांच्या अजेंड्यावर हा निर्णय आहे. तसेच, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष वी.के. यादव यांचीही या प्रस्तावाला प्रथम प्राधान्यता आहे. सन 2015 मध्ये भारतीय रेल्वेमध्ये विवेक देबरॉय समितीच्या शिफारसीनुसार रेल्वेने पुनर्गठनचा प्रस्ताव ठेवला होता. रेल्वे बोर्डमध्ये एक काम करण्यासाठी अधिक अधिकारी आहेत. तर, झोन्समध्ये याची संख्या कमी असून कार्यक्षमता वाढविण्यासाठी झोन्समध्ये अधिकाऱ्यांची गरज असल्याची चर्चाही रेल्वे विभागात नेहमीच होत होती. 

यांसंदर्भातील पॅनेलने आपल्या अहवालात, रेल्वेकडून विभागीय रेल्वेच्या संस्कृतीवर प्रभाव टाकण्यात येत आहे. रेल्वे बोर्डसहित रेल्वे स्टाफची संख्याही अधिक झाली आहे. त्याचा विपरीत परिणाम रेल्वे संघटनामध्ये जाणवत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात येत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.  

टॅग्स :रेल्वेभारतीय रेल्वेनोकरीबदली