Join us

राहुल बजाज यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 04:53 IST

प्रख्यात उद्योगपती राहुल बजाज यांनी बजाज फिनसर्व्ह या कंपनीच्या चेअरमन व नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पदाचा राजीनामा दिला आहे.

नवी दिल्ली : प्रख्यात उद्योगपती राहुल बजाज यांनी बजाज फिनसर्व्ह या कंपनीच्या चेअरमन व नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र यापुढेही राहुल बजाज हे या कंपनीचे मानसेवी तहयात चेअरमन असतील. त्यांचा राजीनामा १६ मेपासून अंमलात येणार आहे. त्यांनी आपल्या राजीनाम्याचे पत्र १५ फेब्रुवारी रोजी संचालक मंडळाला पाठविले होते.बजाज फिनसर्व्ह कंपनीच्या इंडिपेंडंट नॉन-एक्झिक्युटिव्ह चेअरमनपदी नानू पमनानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते आपल्या पदाची सूत्रे १७ मे रोजी स्वीकारतील. जी. जे. बालाजीराव, नानू पमनानी, गीता पिरामल यांची इंडिपेंडंट डायरेक्टर म्हणून आणखी पाच वर्षांसाठी नियुक्ती करण्याच्या प्रस्तावालाही कंपनीने मंजुरी दिली.